22 C
Madhya Pradesh
September 30, 2026
Bundeli Khabar
IMG 20210831 WA00062
महाराष्ट्र

फ प्रभागातील गोविंद निवास या अतिधोकादायक इमारतीच्या निष्कासनाची धडक कारवाई

Bundelikhabar

प्रमोद कुमार/महाराष्ट्र
कल्याण : पावसाळ्याच्या काळावधीत अतिधोकादायक इमारती कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीकोनातून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व प्रभागक्षेञ अधिकारी यांना अतिधोकादायक इमारती निष्कासित करणेबाबतचे निर्देश यापूर्वीच दिले आहेत, त्यानुसार विभागीय उपआयुक्त पल्लवी भागवत यांचे मार्गदर्शनाखाली फ प्रभागक्षेञ अधिकारी भरत पाटील यांनी डोंबिवली पूर्व, अंबिका नगर, गोग्रासवाडी येथील गोविंद निवास (G+4 ) या अतिधोकादायक इमारतीच्या निष्कासनाची कारवाई माहे ऑगस्टमध्ये सुरू केली. सदर इमारत 1989 साली बांधण्यात आली असून या इमारतीस जानेवारी 2021 पासून नोटीस बजावण्यात येत होती।

IMG 20210831 WA00063

या इमारतीमधील रहिवाश्यांना रहिवासमुक्त करुन इमारतींमधील सदनिकांचे मोजमाप करुन त्यांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले आहे.सदर इमारत ही दाट वस्तीमध्ये असल्यामुळे इमारतीच्या निष्कासनाचे काम प्रारंभी मनुष्यबळाच्या सहाय्याने सुरु करण्यात आले. आज रोजी सदर कारवाई अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी/कामगार तसेच 4 ब्रेकर,4 कॉम्प्रेसर मशिन व महापालिका पोलिस कर्मचारी यांचे मदतीने सुरु करण्यात असून ती पुढील 2 दिवस सुरु राहणार आहे.


Bundelikhabar

Related posts

रोजगार मेले में कई दिव्यांग हुए लाभान्वित

Bundeli Khabar

चित्रकार रामकृपाल नामदेव कि लता मंगेशकर पर चित्रलतिका प्रदर्शनी

Bundeli Khabar

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली शाळा सुरू करण्यास मान्यता

Bundeli Khabar
error: Content is protected !!