28.9 C
Madhya Pradesh
May 6, 2024
Bundeli Khabar
Home » सनदी अधिकारी घडविण्यासाठी
महाराष्ट्र

सनदी अधिकारी घडविण्यासाठी

*१ हजार गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती*

*रिलायबल अकॅडमीचा समाजोपयोगी उपक्रम*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : उत्तम सनदी अधिकारी घडविण्यासाठी मुंबईतील १०० महाविद्यालयांमधील १ हजार गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा उपक्रम रिलायबल अकॅडमीने जाहीर केला आहे, या स्तुत्य उपक्रम आहे, अशा विद्यार्थ्यांना वेळेत योग्य पाठबळ मिळाले तरच समाजात उत्तम सनदी अधिकारी घडू शकतील, संस्थेचे प्रमुख मनोहर पाटील यांनी जे सामाजिक दायित्व स्वीकारले आहे, हे प्रशंसनीय आहे, असे विचार गृह विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. रविंद्र शिसवे यांनी व्यक्त केले. ते विलेपार्ले येथे आयोजित व्हीसॅट या सॅटलाईट द्वारे चालणाऱ्या शिक्षण प्रणालीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

विद्यार्थी घडवण्यामध्ये पालकांची भूमिका जशी महत्त्वाची आहे त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाची भूमिका ही महाविद्यालय यांची आहे. नवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन बनवलेल्या व्हीसॅट प्रणालीचा वापर हा थेट महाविद्यालयीन काळापासूनच विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षेची जाणीव करून देणार असेल त्यामुळे त्याच्या यशाकडचा प्रवास हा अतिशय कमी काळामधला असणार आहे तरी या उपक्रमाचा फायदा केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग, बँका, रेल्वे, एसएससी, पोस्ट अशा शासकीय आस्थापनांमध्ये सेवा करू इच्छिणार्‍यांसाठी होणार आहे. त्याकरिता मुंबई व परिसरातील शंभर महाविद्यालयात सदरची एचआय-व्हीसॅट प्रणाली सुरू करून त्या माध्यमातून हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची घोषणा संस्थेचे संस्थापक मनोहर पाटील केली. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून रिलायबल अकॅडमीने अनेक प्रशासकीय अधिकारी घडविले आहे. हे करत असताना परिस्थितीमुळे स्पर्धा परिक्षांसाठी मार्गदर्शनाचा अभाव तसेच गुणवत्तेला वाव मिळत नसल्याची अनेक उदाहरणे दिसून आली. त्यामुळेच समाजासाठी आपले दायित्व जोपासण्याच्या भावनेतून १ हजार विद्यार्थ्यांना घडविण्याचा उपक्रम राबविण्याचे संस्थेचे ठरवले आणि त्यानुसार आता प्रत्यक्षात कार्यवाही होत आहे,

प्रशिक्षणाच्या काळात योग्य ते तांत्रिक सहकार्य उपलब्ध व्हावे, ऑनलाईन प्रशिक्षण, यासाठी टाटा समूहाच्या वतीने सहकार्य देण्यात येणार आहे, प्रशिक्षण हे थेट उपग्रहाच्या माध्यमातून देण्यात असल्यामुळे कोणत्याही प्रकारची नेटवर्कचा बाधा विद्यार्थ्याला ज्ञानग्रहण करण्यासाठी येणार नाही याची काळजी टाटा कंपनीने घेतली आहे, असे टाटा नेल्कोचे संजय गुप्ता यांनी सांगितले. व्ही. जी. लर्निंगचे संचालक विनोद गुप्ता यांनी सिंगापूर सारख्या प्रगत राष्ट्रांमध्ये सुद्धा उपग्रह शिक्षण प्रणालीचे महत्त्व उपस्थित सर्वांना सांगितले. स्पर्धा परीक्षेचा ३०० पेक्षा जास्त सेमिनारचा अनुभव असणारे संदीप पाटील यांनी गेल्या दहा वर्षातील स्पर्धा परीक्षा क्षेत्रात होणारे नवनवीन बदल तसेच अशा बदलांना सामोरे जाण्यासाठी कॉलेज व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून थेट विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच स्पर्धा परीक्षेचे ज्ञान कशाप्रकारे देण्यासाठी रिलायबल अकॅडमी कटिबद्ध आहे यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमास महाविद्यालयांमधील संस्थेचे विश्वस्त प्राचार्य उपप्राचार्य उपस्थित होते.

Related posts

वीजबिल वसुलीला गती द्या; प्रभारी सहव्यावस्थापकीय संचालक रेशमे यांचे निर्देश

Bundeli Khabar

एमजी मोटर ने लॉन्च किया मेटावर्स प्लेटफॉर्म ‘एमजीवर्स’

Bundeli Khabar

ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने घोषित किया चौथी तिमाही के परिणाम

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!