35.8 C
Madhya Pradesh
May 2, 2024
Bundeli Khabar
Home » ह प्रभागातील सुनंदा निवास व चिंतामण बिल्डींग या दोन अतिधोकादायक इमारतींच्या निष्कासनाची धडक कारवाई
महाराष्ट्र

ह प्रभागातील सुनंदा निवास व चिंतामण बिल्डींग या दोन अतिधोकादायक इमारतींच्या निष्कासनाची धडक कारवाई

प्रमोद कुमार/महाराष्ट्र
कल्याण : पावसाळ्याच्या काळावधीत अतिधोकादायक इमारती कोसळून होणारी दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीकोनातून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व प्रभागक्षेञ अधिकारी यांना अतिधोकादायक इमारती निष्कासित करणेबाबतचे निर्देश यापूर्वीच दिले होते. त्यानुसार विभागीय उपआयुक्त सुधाकर जगताप यांचे मार्गदर्शनाखाली डोंबिवली पश्चिम येथील ह प्रभाग क्षेत्रातील महात्मा फुले रोडवरील सुनंदा निवास व चिंतामण बिल्डींग या दोन अतिधोकादायक इमारतीच्या निष्कासनाची कारवाई आज सुरू करण्यात आली. सुनंदा निवास ही इमारत तळ +2 मजल्याची असून 1974 साली बांधलेली होती. या इमारतीमध्ये 6 भाडेकरू आणि 3 व्यावसायिक गाळे होते. सदर इमारतीस 2018 पासून दरवर्षी नोटीस बजावण्यात येत होती।

त्याचप्रमाणे चिंतामण बिल्डींग(तळ+2) ही 30 वर्षे जुनी असून त्यामध्ये 4भाडेकरु आणि 2 व्यावसायिक गाळे होते. सदर इमारतीस सन 2018 पासून नोटीस बजावण्यात येत होती. सदर दोन्ही इमारतींमधील रहिवाश्यांना भोगवटा प्रमाणपत्र देऊन, रहिवास मुक्त करून आज निष्कासनाची कारवाई ह प्रभागक्षेञ अधिकारी सुहास गुप्ते यांनी अतिक्रमण निर्मुलन पथकाचे 20 कर्मचारी/कामगार, 1 जेसीबी, 1 पोकलेन , महापालिकेचे पोलिस कर्मचारी व विष्णूनगर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने पूर्ण केली।

Related posts

वयाच्या १८ व्या वर्षी आपण सज्ञानी होतो म्हणजे नक्की काय: वैष्णवी बांगरे

Bundeli Khabar

तेरापंथ महिला मंडल मुंबई का “360 डिग्री इंम्पेक्ट” महाराष्ट्र स्तरीय प्रबुद्ध महिला सम्मेलन आज

Bundeli Khabar

द्वारिकामाई चैरिटी संस्था द्वारा ‘भिक्षा नही शिक्षा’ अभियान की पहल

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!