26.9 C
Madhya Pradesh
April 19, 2024
Bundeli Khabar
Home » अखेर मंदिरातील दानपेटी चोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने अटक
महाराष्ट्र

अखेर मंदिरातील दानपेटी चोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने अटक

डॉ. दिपेश पष्टे/महाराष्ट्र
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांमध्ये दानपेटी चोरीचे प्रमाण वाढले होते, दानपेटी चोरी गेल्याच्या विविध पो.स्टे.मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन आरोपींना अटक करण्यात आली, आरोपींकडून ५७५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पो.स्टे.सेनगांव, गोरेगांव, पो.स्टे हिंगोली ग्रामीण या ठीकाणी मंदिरातील दान पेटी चोरी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या सुचनेनुसार, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले होते, पथकाच्यावतीने तपासाचे चक्र फिरवत आरोपी अदिनाथ शिवाजी हानवते वय २५ वर्ष रा.आडोळ, व आरोपीचा साथीदार कुष्णा सूर्यभान जुमडे वय २५ वर्ष रा.आडोळ ता.सेनगांव यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपींनी सेनगांव हद्दीतील खैरी घुमट येथील कानिफनाथ मंदिर तसेच कवठा शिवारातील जगदंबा मंदिर, हिंगोली ग्रामीण हद्दीतील ईडोळी येथील जागृत महादेव मंदिर, नांदुरा येथील देवीचे मंदिर, व पो.स्टे गोरेगाव येथील नाग माथा मंदिरातील दानपेटी चोरी केल्याची कबुली दिली . एकुण ५ ठीकाणच्या दान पेटी चोरी प्रकरणी आरोपींकडून ५७५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच पुढील तपासकामी अहवाल,जप्त करण्यात आलेला मुद्देमाल व आरोपींना सेनगांव पो.स्टे. येथे हजर करण्यात आले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख ,पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उ. शिवसांब घेवारे, पो. उ. अभय माकणे, भाग्यश्री कांबळे, बालाजी बोके ,संभाजी लेकुळे ,भगवान आडे, विठ्ठल कोळेकर, नितीन गोरे ,राजू ठाकुर ,ज्ञानेश्वर साळवे ,किशोर सावंत, आकाश ठाकरे ,ज्ञानेश्वर पायघन यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास सेनगांव हद्दीतील दोन गुन्ह्या प्रकरणी सेनगांव पो.नि. रणजित भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली खैरी घुमट येथील कानिफनाथ मंदिर येथील तपास पो.ह. जाधव करत आहेत तसेच कवठा शिवारातील जगदंबा मंदिर येथील तपास पो.ह.जळके करत आहेत।

Related posts

विद्यार्थियों के शैक्षणिक परिणामों सुधार लाएगा फिजिक्सवाला

Bundeli Khabar

हाड गोठवणाऱ्या थंडीत टायगरचा शर्टलेस डान्स, कू वरील व्हिडीओचा नेटकऱ्यांमध्ये धुमाकूळ

Bundeli Khabar

स्वास्थ्य विभाग के पेपर लीक मामले में दो लोगो को पुलिस ने किया गिरफ्तार

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!