31.9 C
Madhya Pradesh
May 19, 2024
Bundeli Khabar
Home » यंदाही ठाणे महापालिकेची फिरती विसर्जन व्यवस्था,महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांची माहिती
महाराष्ट्र

यंदाही ठाणे महापालिकेची फिरती विसर्जन व्यवस्था,महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांची माहिती

प्रमोद कुमार/महाराष्ट्र
ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण, उत्सव साधेपणाने साजरे करण्यासंदर्भातच्या राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नागरिकांनी गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यासाठी घराबाहेर पडू नये तसेच त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी यंदाही शहरात प्रत्येक प्रभाग समितीमध्ये फिरती विसर्जन व्यवस्था निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली।


कोविड- १९ च्या अनुषंगाने यावर्षी ही सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. यावर्षीही ठाण्यात श्री विसर्जनाच्यावेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिका विविध उपाययोजना करीत असून त्यासाठी कृत्रीम तलावासोबतच स्विकृती केंद्रे तयार करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे डिजी ठाणे प्रणालीव्दारे देखील गणेश विसर्जनासाठी ऑनलाईन टाईम स्लॉट बुकींग योजनाही राबविण्यात येणार आहे।


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यासाठी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी यंदाही फिरती विजर्सन व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. या व्यवस्थेच्या माध्यमातून ट्रॅक्टर अथवा जीपच्या मागे सिंटेक्स टाकीच्या माध्यमातून कृत्रीम विसर्जन व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. या ठिकाणी विसर्जनासाठी महापालिकेतर्फे स्वयंसेवक नेमण्यात येणार आहेत. तसेच निर्माल्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र भाविकांना विसर्जनासाठीची आरती ही घरीच करावी लागणार असून महापालिकेने तयार केलेल्या या फिरत्या विजर्सन व्यवस्थेतंर्गत श्री गणेशाचे कृत्रीम तलावामध्ये ज्याप्रमाणे विधीवत विसर्जन करण्यात येते त्याच पध्दतीने श्रींचे विसर्जन करण्यात येणार आहे. महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग समितीमध्ये वाहनांव्दारे ही फिरती विसर्जन व्यवस्था तयार करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली आहे।

Related posts

शिवसेनाच्या वतीने सोनटक्के गावात संपन्न झाला १० वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

Bundeli Khabar

पुणे जिले के 42 गांवों में सख्त लॉकडाउन

Bundeli Khabar

ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या सांस्कृतिक विभाग अध्यक्षपदी सुनील जगताप यांची निवड

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!