22.4 C
Madhya Pradesh
September 13, 2026
Bundeli Khabar
IMG 20210930 WA0019
महाराष्ट्र

ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या सांस्कृतिक विभाग अध्यक्षपदी सुनील जगताप यांची निवड

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
शहापूर : मराठी कलावंताच्या न्याय हक्कासाठी काँग्रेसचा सांस्कृतिक विभाग विद्याताई कदम यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरावर सक्रिय काम करत असून वासींद येथील नाट्य,मालिका व चित्रपट कलावंत सुनील जगताप यांची ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी सुनील जगताप यांची सांस्कृतिक विभागाच्या प्रदेश अध्यक्षा विद्याताई कदम यांच्याकडे शिफारस केली होती त्यानुसार जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे,शहापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी त्यांना नियुक्ती पत्र देऊन जगताप याना शुभेच्छा
सुनील जगताप हे हरहुन्नरी कलाकार असुन नाट्य,मालिका व मराठी चित्रपटात त्यांनी काम केले आहे,शासनाच्या अनेक योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी त्यांनी अनेक पथनाट्य सुद्धा सादर केली आहेत, मराठी व ग्रामीण भागातील कलाकारांना न्याय देण्यासाठी यापुढे आपण संघटनेच्या माध्यमातून कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले,
दरम्यान सुनील जगताप यांचे काँग्रेसचे शहापूर तालुका अध्यक्ष महेश धानके,लक्ष्मण घरत,रवींद्र परटोळे,भास्कर जाधव,रवींद्र भोईर,रामचंद्र जोशी,शांताराम धामणे,कैलास निकाळे, संजय वेखंडे यांनी अभिनंदन केले आहे.


Bundelikhabar

Related posts

डोंबिवली पूर्व देसले पाडा येथील तळ + 4 मजली अनधिकृत इमारतीवर निष्कासनाची धडक कारवाई

Bundeli Khabar

4.65 लाख रुपये के मादक पदार्थ बरामद कर तीन लोगों को किया गिरफ्तार

Bundeli Khabar

रजनी साहू लिखित काव्य संग्रह ‘सत्यम शिवम सुंदरम’ के लोकार्पण समारोह में पहुंचे दिग्गज साहित्यकार

Bundeli Khabar
error: Content is protected !!