28.9 C
Madhya Pradesh
May 6, 2024
Bundeli Khabar
Home » भिवंडीत शिवसेनेची घौडदौड सुरच
महाराष्ट्र

भिवंडीत शिवसेनेची घौडदौड सुरच

भगवानदास/महाराष्ट्र
भिवंडी : शहरात आता शिवसेना अँक्शन मोड मध्ये आली असून गेल्या महिन्याभरापासून शहरातील विविध भागात निरंतर पदनियुक्तींचा सपाटा लावला आहे. आज गुरुवार दि. २६ आँगस्ट रोजी सुद्धा शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय अजयनगर येथे मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांना पदनियुक्ती प्रमाणपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडला. सर्वात विशेष बाब म्हणजे शिवसेना शहरप्रमुख श्री. सुभाषजी माने साहेब यांनी दिव्यांग सेना अध्यक्ष म्हणून श्री.प्रकाश वड्डेपेल्ली आणि उपाध्यक्ष म्हणून श्री. नरेश तरे यांची नेमणूक केल्याने शिवसेना आता समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहचविली आहे.
भिवंडी शिवसेना शहर शाखेच्या वतीने नुकतेच दक्षिण भारतीय सेल अध्यक्ष, गुजराती सेल अध्यक्ष, नाका कामगार सेल अध्यक्ष यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. त्यात आज दिव्यांग सेल अध्यक्षांची भर पडल्याने शिवसेना आता समाजाच्या तळागाळातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचली आहे. त्यातच आज मुस्लिम समाजातील शिवसैनिकांना शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख यासारख्या महत्त्वाच्या पदावर नियुक्त्या प्रदान केल्याने मिशन – २०२२ चे लक्ष शिवसेना गाठणारच यात शंका उरली नाही. आज झालेल्या कार्यक्रमात भिवंडी शहरातील नेहरूनगर, टिळकनगर, वर्मानगर, हनुमान मंदिर, नवीवस्ती, नदियापार, शांतीनगर अशा विविध भागात विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, कार्यालयप्रमुख, गटप्रमुख अशा तब्बल ५५ नियुक्त्या प्रदान करण्यात आल्या. त्यामुळे भिवंडी शहरात दिवसेंदिवस शिवसेनेची ताकद वाढतच चालली असल्याचे निदर्शनास येते।


पुढील सप्ताहात सुद्धा खुप मोठ्या प्रमाणात नियुक्त्या प्रदान करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन होणार असल्याचे शिवसेना शहरप्रमुख श्री. सुभाषजी माने साहेब आणि शहर सचिव श्री. महेंद्र कुंभारे यांनी सांगितले. आजच्या कार्यक्रमात शहरप्रमुख सुभाषजी माने साहेब यांच्या हस्ते नियुक्ती प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. तसेच महानगरप्रमुख श्री. श्याम पाटील, शहर सचिव श्री. महेंद्र कुंभारे, विधानसभा संघटक (पूर्व) (पश्चिम) अनुक्रमे श्री. दिलीप नाईक, आणि श्री. मदन भोई, विधानसभा सचिव (पूर्व) (पश्चिम) अनुक्रमे श्री. गोकुळ कदम आणि श्री. दिलीप कोंडलेकर, महिला शहर संघटक (पूर्व) सौ. कोमल पाटील, उपशहरप्रमुख श्री. श्रीनाथ पाटील, श्री. राहुल चौधरी, श्री. सुरेश कारेकर आणि शिवसैनिकांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. दिलीप नाईक यांनी तर आभार प्रदर्शन श्री. महेंद्र कुंभारे यांनी केले।

Related posts

कॅनॉट दुकानदार स्मार्ट सिटीसोबत रस्त्याच्या परिवर्तनासाठी काम करतील

Bundeli Khabar

ट्रूकची तेलुगू टायटन्ससोबत भागीदारी

Bundeli Khabar

कडोंमपा ‘अ’ प्रभाग क्षेत्रात अनधिकृत बांधकामांना सहाय्यक उपायुक्तांचे संरक्षण

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!