39.3 C
Madhya Pradesh
May 18, 2024
Bundeli Khabar
Home » श्रमजीवी संघटनेच्या आदोलनच्या इशा-याची पोलिसांनी घेतली दखल
महाराष्ट्र

श्रमजीवी संघटनेच्या आदोलनच्या इशा-याची पोलिसांनी घेतली दखल

श्रमजीवी संघटनेच्या आदोलनच्या इशा-याची पोलिसांनी घेतली दखल,
सोनटके येथील पोलीस पाटील हल्ला प्रकरणी आरोपींवर वाढीव कलम दाखल ; आरोपी फरार  

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : भिंवडी तालुक्यातील सोनटक्के गावातील पोलीस पाटील दिपक पाटील यांच्यवर गावातील गावगुंडांनी प्राणघात हल्ला केल्याची घटना बुधवारी घडली आहे . या हल्यात पोलिस पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याने त्यांच्यावर शहरातील स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सूरू आहेत. याप्रकरणी गणेश मारूती भगत, रूपेश राजाराम भगत या दोघांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आरोपी रुपेश भगत हा दारू पिऊन पत्नीला मारहाण करत असल्याने पत्नीने पती रुपेश विरोधात तालुका पोलीस ठाण्यात तक्रार केली असता गावचे पोलीस पाटील या नात्याने तालुका पोलिसांनी पोलीस पाटील दीपक पाटील यांना आरोपी रुपेश भगत यास पोलीस ठाण्यात हजर राहण्याचा निरोप देण्यास सांगितले असता पोलिसांचा निरोप रुपेश यास दिला असता या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी गणेश मारूती भगत, रूपेश राजाराम भगत या दोघांनी पोलिस पाटील कवाड येथे कामानिमित्त आले असता त्याठिकाणी गाठून या दोघांनीही लाकडी दाडक्यानी लाथाबूक्यांनी मारहाण करून पोलीस पाटील यांना गंभीर जखमी केले।

या मारहाण प्रकरणी गणेश मारूती भगत, रूपेश राजाराम भगत या दोघांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता . मात्र जखमी पोलीस पाटील हे शासकीय सेवक असल्याने आरोपींवर गंभीर गुन्ह्याची नोंद व्हावी व त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी पोलीस पाटील यांच्या कुटुंबियां बरोबरच पोलीस पाटील संघटना तसेच श्रमजीवी संघटनेकडून करण्यात आली होती . शुक्रवारी श्रमजीवी संघटनेचे जनरल सेक्रेटरी बाळाराम भोईर, ठाणेजिल्हा अध्यक्ष अशोक सापटे शहर तालूका अध्यक्ष सागर देसक उपाध्यक्ष प्रदीप चौधरी,तानाजी लहागे, मोतीराम नामकूडा, सूरेश बिज,सूनिल धापशी ,महेद्र निरगुडा, गौतम पाटील, भरत गडग,दयानंद पाटील, अंकूश जाधव,सूरेश वाघचौरे पदाधिकाऱ्यांनी जेम्बै शीष्टमंडलाने तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींवर गंभीर गुन्हा दाखल केल्याची मागणी केल्या नंतर शुक्रवारी तालुका पोलिसांनी दोघा आरोपींविरोधात कलम ३५३ सह इतर गंभीर गुन्हा दाखल केला आहे. मात्र या प्रकरणातील दोन्ही आरोपी अजूनही फरार असून पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिस पाटील संघटनेचे कोकण विभागाचे अध्यक्ष साईनाथ पाटील भिंवडी तालूका अध्यक्ष सोमनाथ पाटील उपाध्यक्ष अच्यूत नादूरकर अमित राऊत,यानीही पोलिस निरीक्षकाची भेट घेतली।

Related posts

चार वर्षों में पुणे मनपा के नगरसेवकों ने 11 करोड़ 57 लाख के थैले बांटे

Bundeli Khabar

तेव्हा आम्ही पूरग्रस्तांना तातडीनं मदत केली होती, हे सरकार का करत नाही

Bundeli Khabar

पिंपळास गावातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!