23.3 C
Madhya Pradesh
October 5, 2024
Bundeli Khabar
Home » ऑन लाईन व ऑफ लाईन ब्लॅक बेल्ट कराटे स्पर्धेत मोहोने आंबिवली येथील नऊ मुलांची बाजी
महाराष्ट्र

ऑन लाईन व ऑफ लाईन ब्लॅक बेल्ट कराटे स्पर्धेत मोहोने आंबिवली येथील नऊ मुलांची बाजी

संदीप शेंडगे/महाराष्ट्र
टिटवाळा : एशियन शितू रियु स्पोर्ट कराटे डो असोसिएशन ऑफ इंडिया व बोक्सिडो या संघटनेच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील मुलांच्या ऑन लाईन व ऑफ लाईन ब्लॅक बेल्ट कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते।


आसाका चे महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष तथा बोक्सिडो उपाध्यक्ष ४० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले कराटेचे ६ वेळा ब्लॅक बेल्ट डिग्री असलेले अनुभवी प्रशिक्षक शिहान संतोष निरभवणे यांच्या कडे होता. निरभवणे यांच्याकडे शास्त्रोक्तरित्या प्रशिक्षण घेत असलेल्या मुलांनी सहभाग घेत दोन दिवस चाललेल्या परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले।


या स्पर्धेत रुतू काळे, सायली कदम, स्वराज बर्हाटे, नीग्रोध अहिरे, सागर पाटील या मुलांनी ब्लॅक बेल्ट डिग्री संपादित केली. तर कल्याणी सावंत, सोपान चव्हाण, जयकुमार चव्हाण, गोपाळ चव्हाण या चार मुलांनी फर्स्ट डिग्री ब्लॅक बेल्ट मिळविला आहे।


या स्पर्धेत परीक्षक संजय गव्हाळे 7th. डिग्री. ब्लॅक बेल्ट यांनी परिक्षकाची भूमिका पार पाडली.आंबिवली मोहोने एन आर सी या ठिकाणाहुन तब्बल नऊ (९) विध्यार्थी उत्तीर्ण झाल्याने मोहोने अंबिवली परिसरातून प्रशिक्षक शीहान संतोष निरभवने आणि स्पर्धक मुलांचे सर्वत्र कौतुक होत आहे।

Related posts

वाड्यातील विजयगड येथे कोरोना काळातील मृतांना श्रद्धांजली व शोकसभा कार्यक्रम संपन्न

Bundeli Khabar

महाराष्ट्र में मचा सियासी भूचाल मुख्यमंत्री के करीबी शिंदे ने की बगावत.

Bundeli Khabar

विस्टाप्रिंट का ‘मेरा नाम, मेरी शान’ अभियान

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!