22.4 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » ठाणे शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ” खान्देश सुपुत्र” कल्याणजी घेटे यांना ” राष्ट्रपती गुणवत्ता पोलीस पदकाने ” सन्मानित.
महाराष्ट्र

ठाणे शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ” खान्देश सुपुत्र” कल्याणजी घेटे यांना ” राष्ट्रपती गुणवत्ता पोलीस पदकाने ” सन्मानित.

प्रमोद कुमार/महाराष्ट्र
ठाणे : ठाणे वाहतूक शाखे अंतर्गत येणाऱ्या भिवंडीतील नारपोली -अंजूरफाटा उपवाहतूक शाखेत ईमाने – इतबारे आपले कर्तव्य बजावनारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणजी नारायण घेटे यांना 15 ऑगस्ट 2021 या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी “राष्ट्रपती पोलीस पदक” देण्यात आले आहे. कल्याणजी घेटे हे आपल्या कर्तव्य काळात स्वतः येथील चौका -चौकात उभे राहून वाहतूक कोंडी सोडवत असून त्यांनी येथील बेशिस्त वाहन चालकांना वाहतूक नियमांचे चांगले धडे दिले आहेत. त्यांनी पावसाळ्यात रस्त्यात पडलेल्या खड्ड्यानमुळे वाहतूक संथ गतीने होऊन वाहतूक कोंडी होत असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या खर्चातून रस्त्यात पडलेले खड्डे जे.सी. बी.च्या साहाय्याने बुजवून घेतल्यामुळे वाहतूक कोंडीला चांगलाच आळा बसला आहे.

         तसेच ठाणे जिल्ह्यातील कोळशेवाडी येथे आपल्या कार्यकाळात संस्मरणीय व कौतुकास्पद  कामगिरी केल्याची दखल घेत  वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणजी नारायण घेटे यांना गुणवत्ता सेवेसाठी "राष्ट्रपती गुणवत्ता पोलिस पदक" देण्यात आले आहे. "राष्ट्रपती गुणवत्ता पोलिस पदक" मिळवणारे हे भिवंडी तालुक्यातील वाहतूक शाखेचे पहिलेच अधिकारी असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या या पुरस्कारा बद्दल ठाणे जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यामधूनही त्याचे अभिनंदन व कौतुक होऊन त्यांचेवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. ते जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील रहिवासी आहेत.अतिसंवेदनशील एटीएस ठाणे जिल्हा मध्ये कार्यरत होऊन अत्यंत महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या निष्कलंक अधिकारी म्हणून त्यांचं नाव ठाणे जिल्ह्यामध्ये आवर्जून घेतले जात आहे .

Related posts

शिवडी पर्यावरणस्नेही करण्याचा संकल्प

Bundeli Khabar

बॉम्बे हाई कोर्ट ने लगाई मोहन ग्रुप को कड़ी फटकार, बिल्डर की याचिका की खारिज

Bundeli Khabar

भिवंडीतील पिंपळास गावातील धक्कादायक प्रकार आला समोर, भूमीवर्ड गेटवरील पाईप लाईन आणि शेतकऱ्यांच्या घरचा रस्ता केला बंद।

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!