24.1 C
Madhya Pradesh
August 12, 2026
Bundeli Khabar
IMG 20210817 WA0009
महाराष्ट्र

टिटवाळा येथे सात वर्षीय चिमुकलीवर सावत्र बापाचा बलात्कार*

Bundelikhabar

टिटवाळा येथे सात वर्षीय चिमुकलीवर सावत्र बापाचा बलात्कार
तालुका पोलिस ठाण्यात नाराधम बापा विरोधात गुन्हा दाखल

संदीप शेंडगे/महाराष्ट्र
कल्याण : टिटवाळा येथे राहणाऱ्या सात वर्षीय चिमुकलीवर तिच्या सावत्र बापाने स्वातंत्र्याच्या दिवशी बलात्कार केल्याची धक्कादायक आणि नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे।


संपूर्ण भारत देश देशाचा ७५ वा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करीत असताना टिटवाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक सात वर्षीय चिमुकली मात्र सावत्र बापाच्या लैंगिक अत्याचाराच्या पारतंत्र्यातून सुटली नाही.
मूळची उत्तर प्रदेश येथे राहणारी सविता नाव बदललेले आहे (वय २५ वर्ष ) टिटवाळा येथे एक वर्षापासून फरशी बसविण्याचे काम करणाऱ्या शेषराव गौतम भारती (वय २६ वर्ष) या व्यक्ती सोबत लग्न न करता राहत आहे. तिला एक मुलगी (सात वर्ष) आणि एक मुलगा (१ वर्ष) असे पहिल्या पतीपासून अपत्य आह।

.
१५ ऑगस्ट रोजी सविता आणि शेषराव यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले या भांडणाची तक्रार देण्याकरिता सवीता ही टिटवाळा पोलीस ठाण्यात गेली. तिला घरी यायला संध्याकाळचे चार वाजले, घरी आल्याबरोबर तिची सात वर्षाची मुलगी रडत होती. रडत असलेल्या आपल्या मुलीला काय झाले असे विचारले असता मुलगी अधिक रडू लागली यावेळी तेथे उपस्थित असलेला शेषरावला सविताने ही मुलगी का रडत आहे असे विचारले असता शेषराव बोलला ती सायकल वरून पडली आहे म्हणून रडत आहे असे सांगितले।


आईने रडत असलेल्या मुलीला जवळच्या दवाखान्यात घेऊन गेली डॉक्टरांनी तिची तपासणी करून तिला उपचाराकरिता मोठ्या दवाखान्यात घेऊन जाण्यास सांगितले. सवीताने आपल्या चिमुकलीला घेऊन उल्हासनगर येथील मध्यवर्ती शासकीय दवाखान्यात उपचाराकरिता करिता घेऊन गेली. डॉक्टरांनी मुलीला तपासून त्या चिमुकलीला काय झाले असे विचारले असता मुलीने रडत रडत सांगितले पापा ने मेरे कपडे निकाले और मेरे उपर सो गये और सु सु करने की जगह पर जोरदार कुछ तो डाला है बहोत दर्द होता है असे म्हणून चिमुकली जोरदार रडू लागली. या संतापजनक घटनेने डॉक्टरही हादरून गेले।


मुलीच्या जबानी वरून डॉक्टरांना बलात्काराचा झाला असल्याचे निष्पन्न आल्याने डॉक्टरांनी पोलिसांना बोलावून घेतले आईला सत्य परिस्थिती सांगितली आई सविताने नराधम शेषराव गौतम (भारती) विरोधात कल्याण तालुका पोलीस स्टेशन टिटवाळा येथे बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. आरोपी शेषराव गौतम भारती विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून आरोपी फरार झाला आहे. त्याच्या शोधा करिता पोलिसांनी उत्तर प्रदेश येथे पथक रवाना केले असल्याचे टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांनी सांगितले आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्राची भांगे करत आहेत।


Bundelikhabar

Related posts

सिडको के उपाध्यक्ष और प्रबंध निदेशक डॉ. संजय मुखर्जी द्वारा विशेष समिति का किया गठन

Bundeli Khabar

मनोरमा साहित्य पुरस्कार २०२१ जाहीर

Bundeli Khabar

सर्वांच्या प्रयत्नामुळे माझा मुलगा सुखरूप घरी पोहोचला- सोन्या पाटील

Bundeli Khabar
error: Content is protected !!