22.4 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » शिवडी पर्यावरणस्नेही करण्याचा संकल्प
महाराष्ट्र

शिवडी पर्यावरणस्नेही करण्याचा संकल्प

शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांचा पुढाकार

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : “अरे मानवा, तूच वसुंधरेचा आधार ! जगव वृक्ष वनांना, तेच खरे तारणहार !!” ह्याच उक्तीला साजेसं काम मुंबईच्या शिवडी परिसरात होत आहे. त्यासाठी विभागीय शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी पुढाकार घेतला आहे.

पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी “माझी वसुंधरा” ही संकल्पना अमलात आणली. या संकल्पनेनुसार काल प्रभाग क्रमांक २०६ मधील स्वर्गीय श्री. मोहन रावले उद्यानातील रिकाम्या जागेत “मियावाकी पद्धतीने” म्हणजे कमी जागेमध्ये जास्त झाडे लावण्याच्या पद्धतीने रोपं लावण्यात आली. ह्या पद्घतीने लावलेली झाडे आजूबाजूला न पसरता सरळ उंच वाढतात. या उद्यानात विलायती मेंधी, कदंब वृक्ष, पोफळी, नीम, कांचन वृक्ष, आवळा, वड, पिंपळ, ताम्हण, आंबा, करंज, अशोक, महोगनी वनस्पती, जांभूळ, बदाम, बकुळ, सागवान, चाफा अशी विविध प्रकारची ५०० झाडे लावण्यात आली. या कामाचे उद्घाटन आमदार अजय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस शाखाप्रमुख हनुमंत हिंदोळे, शाखासंघटक शुभदा पाटील तसेच शाखेतील पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts

बिसलेरी ट्रस्ट’तर्फे ‘बॉटल्स फॉर चेंज’ उपक्रमाद्वारे वापरलेल्या, स्वच्छ व कोरड्या 650 किलो प्लास्टिकचे

Bundeli Khabar

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर मंगळवारी घेणार

Bundeli Khabar

अवैध इमारतों की शिकायतें अनदेखा करते है मनपा अधिकारी

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!