20.2 C
Madhya Pradesh
September 29, 2026
Bundeli Khabar
IMG 20210810 WA0017
महाराष्ट्र

रस्त्यावर गाडी थांबून कोणताही वाहतूक अंमलदार गाडीचे कागदपत्र तपासू शकत नाही – हेमंत नगराळे

Bundelikhabar

महाराष्ट्र/आर्चिस पाटील

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी एक परिपत्रक काढून आपली नाराजी व्यक्त केली आहे. आयुक्तांच्या म्हणण्यानुसार काही वाहतूक अंमलदार हे रस्त्यावरच वाहन अडवून त्यांची तपासणी करतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होऊन वाहतूक कोंडी होते. वाहतूक विभागातील अधिकारी व अंमलदार यांचेकडून वाहन तपासणे अपेक्षित नाही. असेही मुंबई पोलीस आयुक्तांचे म्हणणे आहे।


तरी सर्व वाहतूक विभाग अधिकारी व अंमलदार यांना निर्देशित करण्यात आले आहे, की वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांवर कायदा व वाहतूक नियमावलीतील तरतुदीनुसार कारवाई करण्यात यावी. याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे तपासणी करू नये।


तसेच संयुक्त नाकाबंदी विभागातही अधिकारी वाहतूक नियमावली अंतर्गत कार्यवाही करतील. त्या व्यतिरिक्त कोणत्याही वाहनाची तपासणी करता येणार नाही. दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्यास संबंधित वाहतूक विभागाचे प्रभारी पोलीस निरीक्षक यास जबाबदार धरण्यात येईल. असेही मुंबई पोलीस आयुक्तांनी परिपत्रकात सांगितले।


मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिलेल्या सूचनांचे अधिकाऱ्यांनी काटेकोर पद्धतीने पालन केल्यास. होणारी वाहतूक कोंडी कमी होईल अशी सर्व वाहनधारकांचे म्हणणे आहे।


Bundelikhabar

Related posts

राज्यपाल के हाथों सम्मानित हुईं एजुकेशनिस्ट प्रोफसर रेणुका बंगार्ड

Bundeli Khabar

राष्ट्रीय मानव अधिकार अपराध एवम् भ्रष्टाचार विरोधी ब्यूरो” की मनाई गई तीसरी वर्षगाँठ

Bundeli Khabar

कोपर पुल का उद्घाटन मुख्यमंत्री के हाथों सम्पन्न

Bundeli Khabar
error: Content is protected !!