23.6 C
Madhya Pradesh
September 10, 2026
Bundeli Khabar
IMG 20210802 WA00042
महाराष्ट्र

पिस्तूलमधून गोळी घालत असल्याचा नाट्य रूपांतरित व्हिडीओ ‘इन्स्ट्राग्राम’ द्वारे व्हायरल नवघर पोलिसांची कारवाई

Bundelikhabar

सदर व्हिडीओमधील घटनास्थळ हे नवघर पोलीस ठाणे, मुंबई हद्दीतील नवीन झालेला- टाटा स्मशानभूमी रोड असलेचे दिसून आलेने वपोनि सुनील कांबळे सो, पोनि संजय लोंढे यांनी तात्काळ संबंधित युवकांचा शोध घेणेस तडीपार पथकाचे फौ. लामखडे व पथक यांना आदेश दिले।

यह भी पढ़ें-भिवंडीतील पिंपळास गावातील धक्कादायक प्रकार आला समोर, भूमीवर्ड गेटवरील पाईप लाईन आणि शेतकऱ्यांच्या घरचा रस्ता केला बंद।

त्यानुसार फौ. लामखडे व पथकाने व्हिडिओवरून त्यांचा शोध सुरु केला.
गुप्त बातमीदा्रांकडून त्यांची ओळख पटवून सापळा कारवाईचे आयोजन करून लागलीच सदर युवकांस ताब्यात घेतले।

त्यांचेकडे कसून चौकशी केली. व्हिडिओ बनवताना वापरलेले पिस्टोल मिळवले असता, ते खेळण्यातील प्लास्टिकचे असलेचे निष्पन्न झाले. सदर मुले ही अल्पवयीन असून मुलुंड पश्चिम व पूर्वेकडील झोपडपट्टी भागातील आहेत.
चौकशीअंती त्यांचा वरील व्हिडीओ बनवण्यामागचा उद्देश ‘मनोरंजन’ असल्याचा दिसून आला.तसेच त्यांना यातील दुष्परिणामाची जाणीव नसलेचे निदर्शनास आले।
सबब, त्यांचे पालकांना संपर्क करून समुपदेशन करून व ताकीदवजा समज देऊन सोडण्यात आले।

सदर कारवाईत फौ. लामखडे, सफौ. लांडे, पोह. ठाकूर, पोशि. शिंदे,बच्छाव,सांगळे,दंडगव्हाळ, लोखंडे यांनी सहभाग घेतला।


Bundelikhabar

Related posts

मराठी शाळा वाचविण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज

Bundeli Khabar

मध्य रेल पर दिनांक 5.9.2021रविवार को मेगा ब्लॉक

Bundeli Khabar

कलाकार फाऊंडेशनकडून विविध राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धांचे प्रमाणपत्र व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

Bundeli Khabar
error: Content is protected !!