35.3 C
Madhya Pradesh
May 22, 2024
Bundeli Khabar
Home » अटाळी येथील इराणी वस्तीत चालतो मटका जुगार अड्डा
महाराष्ट्र

अटाळी येथील इराणी वस्तीत चालतो मटका जुगार अड्डा

मटका चालक सतत जागा बदलत असल्याने पोलिस कारवाईत अडथळा.

संदीप शेंडगे / महाराष्ट्र
कल्याण : मोहने अटाळी येथील इराणी वस्तीत राजरोसपणे मटका जुगार अड्डा सुरू असल्याने नागरिकांची मोठी आर्थिक लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे।


मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील डान्सबार आणि मटका जुगार अड्ड्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असून अनेक मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे धाडसत्र सुरू असून मटका जुगार चालकांवर कारवाई सुरू आहे. परंतु अटाळी येथील इराणी वस्तीत राजरोसपणे मटका जुगार सुरू आहे हीच ती इराणी वस्ती आहे जिथे मोठ-मोठ्या पोलिस अधिकाऱ्यांना प्रवेश करायला भीती वाटते या इराणी वस्तीमध्ये अनेकदा पोलिसांवर हल्ले झालेले आहेत याच इराणी वस्तीमध्ये राजरोसपणे मटका जुगार अड्डा सुरू आहे. मटका चालक हा सतत आपली जागा बदलत असल्यामुळे त्याच्यावर पोलीस कारवाई करणे अवघड जात आहे. ज्या ठिकाणी शहाड मोहोने अटली वडवली येतील नागरिक मोठ्या प्रमाणात जुगार खेळायला येत असून आपल्या मेहनतीची कमाई हारत आहेत
राज्यात सर्वत्र लॉक डाऊन असल्याने नागरिकांचे रोजगार व उद्योग धंदे बंद आहेत. नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आपल्या तुटपुंज्या कमाईतून कुटुंबासाठी ठेवलेली रक्कम पैसे दुप्पट होण्याच्या नादात नागरिक या मटका जुगार अड्ड्यावर लुटत असल्याने महिलावर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे।


या जुगार अड्ड्यावर इराणी महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात जुगार खेळतात. या इराणी लोकांकडे इतक्या मोठ्या प्रमाणात जुगार खेळण्यासाठी पैसे येतात तरी कुठून असा सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे. पाटील नगर जवळील इराणी वस्तीत हा जुगार अड्डा सुरू असून हा मटका चालक मोठ्या शिताफीने सतत आपली जागा सतत बदलत आहे कधी भास्कर विद्यालयासमोर तर कधी वाल्मिकी शाळेसमोर तर कधी आपल्या हस्तकांना मार्फत फिरून चिठ्ठ्या फाडण्याचे काम करीत आहे.
त्यामुळे पोलिसांना कारवाईत मोठा अडथळा येत आहे.
असे असले तरी नागरिकांच्या मेहनतीच्या पैशावर पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून बेकायदेशीरपणे मटका सुरू ठेवणार्या वर पोलिसांनी कायदेशीर ठोस कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसे न झाल्यास नागरिक आपल्या मेहनतीचे पैसे असेच या मटका चालकाकडे देत राहतील आणि एक दिवस त्यांच्या कुटुंबातील महिलांना आत्महत्या करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही आणि या आत्महत्येला पोलीस प्रशासनाला जबाबदार धरले जाईल. त्यामुळे पोलिसांनी गुप्त पद्धतीने तपास करून या मटका चालकाच्या मुसक्या आवळने गरजेचे आहे।

Related posts

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक मिळविणारा ठाणे जिल्ह्यातील पहिला खेळाडू पै.ओमकार कराळे

Bundeli Khabar

अखिल झावबावाडी साई सेवा मंडळातर्फे माननीय श्री. प्रविणजी अग्रवाल यांचा सत्कार

Bundeli Khabar

उत्तरप्रदेश के पूर्व मंत्री आर के चौधरी का मुंबई दौरा

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!