28.5 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
IMG 20211217 WA0006
महाराष्ट्र

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक मिळविणारा ठाणे जिल्ह्यातील पहिला खेळाडू पै.ओमकार कराळे

Bundelikhabar

ठाणे जिल्ह्यात एक् इतिहास घडविला..

भिवंडी : १४ डिसेंबर ते १६ डिसेंबर २०२१ रोजी रांची झारखंड येथे झालेल्या १५ वर्षाखालील राष्ट्रीय ग्रिको रोमन कुस्ती स्पर्धेत कुस्तीचे माहेर घर असलेल्या कलानिकेतन व्यायामशाळेचा उगवता तारा पै.ओमकार संतोष कराळे यांनी ग्रिकोरोमन ३८ किलो वजनीगटात कांस्य पदक जिंकून ठाणे जिल्ह्यात एक् इतिहास घडविला.

राष्ट्रीय स्पर्धेत पै.ओमकार कराळे याने कांस्य पदक जिंकल्याबद्दल त्याचे आणि मार्गदर्शक रुस्तुम ए हिंद पै.अमोल भाऊ बुचडे यांचे ठाणे जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे खजिनदार सुरेशदादा पाटील,महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे वरीष्ठ उपाध्यक्ष सर्जेराव आबा शिंदे,विभागीय सचिव मारुती आडकर, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्यकारी सदस्य सुभाष घासे,पंढरीनाथ ढोणे (बापू) अध्यक्ष-कल्याण डोंबिवली कुस्तीगीर संस्था,रायगड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार बाळाराम पाटील,भिवंडी तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष श्रीधर पाटील,बंडू हनुमान पाटील मा.सदस्य-पंचायत समिती भिवंडी,हनुमान म्हात्रे संचालक-कृषी उत्पन्न बाजार समिती,आंतरराष्ट्रीय पंच विकास पाटील,राष्ट्रीय पंच प्रा.श्रीराम पाटील,सुभाष ढोणे (कार्यकारी सदस्य-महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद),शेखर शिंदे,युवराज पाटील,सतिश म्हात्रे,आयुब मुल्ला,शैलेंद्र पाटील,विष्णू पाटील,किसन भोईर,प्रज्वलदीप ढोणे,गणेश पाटील,जयनाथ पाटील,नरेंद्र पाटील,मुकुंद मढवी,राजू चौधरी,दिपक ठाकरे,मदन चिकणकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

कलानिकेतन व्यायामशाळेचा उगवता तारा कुस्तीगीर पै.ओमकार संतोष कराळे यांनी कांस्य पदक जिंकल्याबद्दल कलानिकेतन मंडळाचे अध्यक्ष प्रा.श्री.विनोद हनुमान पाटील,कोनगावच्या सरपंच डॉ.रुपाली अमोल कराळे,भाजपा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष पै.प्रमोद हनुमान पाटील,मा.उपसरपंच पांडुरंग कराळे,नवनिर्वाचित उपसरपंच भरत जाधव,कोकण केसरी हरेश कराळे,सर्व ग्रामपंचायत सदस्य,कलानिकेतन मंडळाचे सर्व आजी,माजी पदाधिकारी,सर्व कुस्तीगीर,विविध संस्थेचे पदाधिकारी,ग्रामस्थ यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

पै.यशवंत बाबू कराळे आणि पै.बाळाराम बाबू कराळे यांचा नातू,पै.संजय यशवंत कराळे यांचा पुतण्या,कलानिकेतन व्यायामशाळेचा युवा कुस्तीगीर पै.ओमकार संतोष कराळे यांनी कांस्य पदक जिंकल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.कुस्तीचे माहेर घर असलेल्या कलानिकेतन व्यायामशाळेचा कुस्तीगीर पै.ओमकार कराळे भविष्यात आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पदक जिंकून एक नवा इतिहास घडवून कलानिकेतन व्यायामशाळेचा कोनगावचा,ठाणे जिल्ह्याचे,महाराष्ट्राचे नाव रोशन करणारच असे राष्ट्रीय पंच,कुस्ती मार्गदर्शक,कलानिकेतन मंडळाचे अध्यक्ष प्रा.श्री.विनोद हनुमान पाटील कोनकर यांनी सांगितले.


Bundelikhabar

Related posts

स्मरण शक्ति कैसे बढ़ाएं पर कार्यक्रम का आयोजन

Bundeli Khabar

नारायण राणेंना उच्च न्यायालयाचा दणका, बंगल्यातील बेकायदा बांधकाम दोन आठवड्यात पाडण्याचे निर्दे

Bundeli Khabar

दगड विटांच्या स्मारकातून माणूस मोठा होत नसतो तर तो त्याच्या विचारातून मोठा होतो – सुरेश पाटील

Bundeli Khabar
error: Content is protected !!