31.1 C
Madhya Pradesh
May 17, 2024
Bundeli Khabar
Home » पुरग्रस्तांना “एक हात मदतीचा”,उदयनराजे भोसले सेना प्रतिष्ठान व बाळकडू पत्रकार संघांकडून पूरग्रस्तांना मदत.
महाराष्ट्र

पुरग्रस्तांना “एक हात मदतीचा”,उदयनराजे भोसले सेना प्रतिष्ठान व बाळकडू पत्रकार संघांकडून पूरग्रस्तांना मदत.

महाराष्ट्र / उमेश जाधव
टिटवाळा-: उदयनराजे भोसले सेना प्रतिष्ठान ठाणे जिल्हा व
बाळकडू पत्रकार संघ संस्थापक अध्यक्ष उमेश जाधव
यांच्या‌ वतीने ‘मदत नाही कर्तव्य’ या भावनेतून कोकणातील पूरग्रस्तांना “एक हात मदतीचा” या भावनेतून जीवनाशक वस्तूंची मदत करण्यात आली।

कोकणातील खेड, चिपळूण, रत्नागिरी, महाड आदी ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी दरडी कोसळून घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे सर्व पाहून पूरग्रस्त बांधवांना मदत करण्याच्या उद्देशाने उदयनराजे भोसले सेना प्रतिष्ठान ठाणे जिल्हा याचे अध्यक्ष सागर तवले व बाळकडू पत्रकार संघ संस्थापक अध्यक्ष उमेश जाधव व कार्यकर्त्यांनी “एक हात मदतीचा” या उक्तीप्रमाणे मदत म्हणून कपडे व जीवनावश्यक
वस्तूंचे १५ किलोचा १ असे २२० किट बनवून ही मदत घेऊन प्रतिष्ठान व संघाचे कार्यकर्ते चिपळूणला रवाना झाले. तेथे त्यांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून जेथे मदतीची गरज आहे, अशा कळंबस्ते मधील वाशिस्टी नगर, दलवटने बागवाडी या गावांमध्ये मदतीचे वाटप केले. मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या या कामाची दखल घेऊन तेथील स्थानिक लोकांनी मनभरून आभार मानले. मंडळाचे अध्यक्ष सागर तवले, पत्रकार उमेश जाधव, अमोल गायकवाड(सोलापूर), सोमनाथ पवार, जगन ठाकरे, सदानंद वाकुर्ले, निकेश वाकुर्ले, श्रीकांत चौधरी, विशाल मिरकुटे,अवी मगर व समीर शिंदे आदी कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध आखणी करून आठवडाभर दिवस दिवस-रात्र मेहनत घेऊन हा उपक्रम यशस्वी केल।

Related posts

एक्शन ड्रामा से भरपूर कार्टेल का पोस्टर हुआ जारी

Bundeli Khabar

किन्नर असमिता संस्था व एकता फाउंडेशन द्वारा टीकाकरण कैम्प का आयोजन 

Bundeli Khabar

ह प्रभागातील सुनंदा निवास व चिंतामण बिल्डींग या दोन अतिधोकादायक इमारतींच्या निष्कासनाची धडक कारवाई

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!