मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाविकास आघाडीतील तीन पक्ष आणि डावे व लोकशाही पक्ष यांचा प्रचंड लाँग मार्च १७ डिसेंबर २०२२ या दिवशी जिजामाता उद्यान, राणीबाग, भायखळा येथून सकाळी ११ वाजता सुरु होणार असून तो आझाद मैदान येथे संपेल. कामगार संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पूर्व तयारी करण्याकरिता मंगळवार दिनांक १३ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी तीन वाजता, महाराष्ट्र इंटक कार्यालय डेव्हिड ससून बिल्डिंग, पहिला मजला, २७ भरूच्या मार्ग, काळा घोडा सिग्नल जवळ, फोर्ट, मुंबई येथे एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी कृती समिती मधील सर्व घटकांना याद्वारे विनंती करण्यात येते की आपण आपला प्रतिनिधी पाठवावा व हा प्रचंड लॉंग मार्च यशस्वी करून भाजप विरोधातील आपले शक्ती प्रदर्शन दाखवावे, असे मुंबई काँग्रेसचे सेक्रेटरी तसेच महाराष्ट्र इंटकचे उपाध्यक्ष अनिल गणाचार्य यांनी कळवले आहे.

