36.4 C
Madhya Pradesh
May 3, 2024
Bundeli Khabar
Home » सोमवारपासून बेस्ट उपक्रमाची ठाणे वांद्रे कुर्ला संकुल दरम्यान प्रीमियम बससेवा सुरू होणा
महाराष्ट्र

सोमवारपासून बेस्ट उपक्रमाची ठाणे वांद्रे कुर्ला संकुल दरम्यान प्रीमियम बससेवा सुरू होणा

*बेस्ट चलो अॅपद्वारे प्रवासी आसने / जागा आरक्षित करू शकतात*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (BEST) सोमवार , दिनांक १२ डिसेंबर २०२२ पासून ठाणे ते वांद्रे कुर्ला संकुल (BKC) दरम्यान प्रीमियम बससेवा सुरु करणार आहे.

“बेस्ट चलो बस” या नावाने सुरू होणारी ही बससेवा वातानुकूलित, शून्य उत्सर्जन असणाऱ्या सोयीस्कर आणि आरामदायी प्रवासाची खात्री देणाऱ्या चार इलेक्ट्रिक बसद्वारे सुरू केली जात आहे. या सेवेमुळे मुंबई हे सर्व – इलेक्ट्रिक प्रीमियम शहर बस सेवा असणारे भारतातील पहिले शहर असेल. ही सेवा सोमवार ते शनिवार चालविण्यात येणार असून पहिल्या टप्प्याचा एक भाग म्हणून, सदर बस एक सर्वसाधारण मार्ग आणि एक जलद मार्गावर अशी संपूर्ण दिवस प्रवर्तित करण्यात येईल.

जलद बसमार्ग – सदर बससेवा ठाणे ते वांद्रे कुर्ला संकुल दरम्यान दर ३० मिनिटांच्या अंतराने सकाळी ७.०० ते सकाळी ८.३० तसेच वांद्रे कुर्ला संकुल ते ठाणे दरम्यान संध्याकाळी ५.३० ते संध्याकाळी ७.०० पर्यंत चालविण्यात येतील.

संपूर्ण दिवस बसमार्ग – सदर बससेवा वांद्रे कुर्ला संकुल ते वांद्रे रेल्वे स्थानक मार्गावर सकाळी ८.५० ते सायंकाळी ५.५० दरम्यान आणि वांद्रे रेल्वे स्थानक ते वांद्रे कुर्ला संकुल दरम्यानच्या मार्गावर सकाळी ९.२५ ते सायंकाळी ६.२५ पर्यंत चालविण्यात येतील.

चलो अॅपद्वारे सदर बसमधील जागा आरक्षित केल्या जाऊ शकतात. आरक्षणावर आधारित प्रवासी असतील तरच बस बसथांब्यावर थांबेल. कमी बसथांब्यांसह जलद प्रवासाची हमी देणाऱ्या सदर बसमध्ये उभे राहून प्रवास करण्याची मुभा नाही.

बेस्ट प्रीमियम बससेवेअंतर्गत मिळणाऱ्या सुविधा – युएसबी चार्जर आणि आरामदायी आसनांसह सर्व इलेक्ट्रिक वातानुकूलित सेवा
चलो अॅपद्वारे आसनांचे आरक्षण
लाइव्ह ट्रैकिंग सुविधा उपलब्ध असल्यामुळे तुम्ही बस पकडण्यासाठी तुमच्या बसथांब्यावर वेळेत पोहोचू शकता
लवचिक पुनर्नियोजन आणि आरक्षण रद्द करण्याचा पर्याय
प्रवास सदस्यत्व घेणारे प्रवासी त्यांच्या दैनंदिन प्रवासाच्या खर्चावर ५० % पर्यंत बचत करू शकतात.

प्रीमियम चलो बसमध्ये आसन कसे आरक्षित करावे – फक्त बेस्ट चलो अॅप डाऊनलोड करा आणि चलो बसवर टॅप करा. बसेसच्या वेळापत्रकासह मार्ग सुचीप्राप्त करण्यासाठी स्त्रोत आणि प्रवासाच्या वेळेनुसार तुमच्या आवडीची बस निवडून गंतव्य प्रविष्ट करा.
तुम्ही एक तर प्रत्येक फेरीसाठी पैसे देऊ शकता किंवा दीर्घकालीन बसपास योजनेसह पैसे देऊन तुमचे आसन आरक्षित करू शकता.

प्रीमियम चलो बससाठी तुमचे आरक्षण कसे प्रमाणित करावे – एकदा तुम्ही जागा आरक्षित केल्यावर तुम्ही ती अॅपच्या होम स्क्रीनवर आगामी आरक्षित फेरी अंतर्गत शोधू शकता.
‘टॅप टू बोर्ड’ बटण दाबा आणि तुमचे आरक्षण प्रमाणित करण्यासाठी तुमचा आरक्षण आयडी शेअर करा.
आता बसा आणि प्रवासाचा आनंद घ्या !

भाडे संरचना बेस्टने जाहीर केलेले दोन्ही मार्गासाठी निश्चित केलेले एकेरी भाडे पुढीलप्रमाणे : संपूर्ण दिवस बसमार्ग : वांद्रे स्टेशन ते वांद्रे कुर्ला संकुल रु. ५०/ जलद बसमार्ग : वांद्रे कुर्ला संकुल ते ठाणे रु. २०५/

प्रति फेरी किमत मार्ग सवलत बसमार्ग स्वागत सवलत योजना : अधिकाधिक मुंबईकरांना प्रीमियम बससेवेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहीत करावे या उद्देशाने बेस्टने स्वागत सवलत योजना सुरु केली असून जी एकेरी भाड्याचा नाममात्र किमतीमध्ये ५ बसफेऱ्यांचा लाभ देते. सदर स्वागत सवलत योजना बेस्ट चलो अॅपवर थेट खरेदी करू शकता ज्याची वैधता ७ दिवसांसाठी असेल.

येत्या काही महिन्यात शहरातील गर्दीच्या बसमार्गावर आणखी २०० प्रीमियम इलेक्ट्रिक बसेस प्रवर्तित करण्याची बेस्टची योजना असून मुंबईकर या प्रीमियम बससेवेचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतात. ज्यामुळे हजारो मुंबईकरांना स्वतःच्या खाजगी कार तसेच कॅबपासून बेस्टच्या सार्वजनिक वाहतूक सेवेकडे वळविण्यास आणि खाजगी वाहनांना रस्त्यावरून कमी करण्यासाठी मदत होईल, असे मनोज वराडे, जनता संपर्क अधिकारी यांनी कळवले आहे.

Related posts

द एकेडमी स्कूल के छात्रों का रोंगटे खड़ा करने वाला रोमांचकारी अनुभव

Bundeli Khabar

तारा आदिवासी सामाजिक संस्थे मार्फत गरीब व गरजू बांधवांना कपडे वाटप

Bundeli Khabar

राज्य सरकार निर्माण को नियमित करने पर कोई ठोस फैसला नहीं ले लेती तब तक अतिक्रमण की कार्रवाई तत्काल रोक दी जाए:विधायक महेश लांडगे

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!