34.2 C
Madhya Pradesh
May 18, 2024
Bundeli Khabar
Home » स्पष्टवक्त्या, निरलस सेवा वृत्तीच्या या निष्ठावान कला तपस्व्यास माझी महाराष्ट्र शासनाच्या वतीने श्रद्धांजली! – सुधीर मुनगंटीवार
महाराष्ट्र

स्पष्टवक्त्या, निरलस सेवा वृत्तीच्या या निष्ठावान कला तपस्व्यास माझी महाराष्ट्र शासनाच्या वतीने श्रद्धांजली! – सुधीर मुनगंटीवार

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ३ डिसेंबर सायंकाळी कीर्ती महाविद्यालय, दादर येथे भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ आणि संस्कार भारती कोकण प्रांत यांच्या वतीने ज्येष्ठ कलाकार मा. विक्रम जी गोखले यांची “स्मृती सभा” आयोजित करण्यात आली होती.

या स्मृती सभेत विक्रमजींच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, विक्रमजींचे शेजारी सुनील सडेकर, निकटवर्ती म्हणून ज्येष्ठ कलाकार, दिग्दर्शक मा. श्रीरंग देशमुख, मा. नारायण जाधव, ज्येष्ठ रंगकर्मी मा. वामन केंद्रे, ज्येष्ठ कलाकार भाजप सांस्कृतिक सेल आणि संस्कार भारतीचे मा. विसुभाऊ बापट आणि भाजप चित्रपट कामगार आघाडीचे डॉ. गोरक्ष धोत्रे आदि मान्यवर उपस्थित होते.

विक्रम गोखले आत्ता आत्ता पर्यंत संस्कार भारती कोकण प्रांताचे अध्यक्ष होते. संस्कार भारतीशी जोडले गेलेले, अखिल भारतीय संरक्षक मा. राजदत्त, अखिल भारतीय अध्यक्ष मा. वासुदेवराव कामत, ज्येष्ठ रंगकर्मी मा. अविनाश नारकर, विद्यमान अध्यक्ष मा. सुनील बर्वे, कार्याध्यक्ष मा. मुकुंद मराठे यांनी व्हिडिओ द्वारे श्रद्धांजली अर्पण केली.

विशेष म्हणजे मा. सांस्कृतिक मंत्री श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार हे प्रवासात असतानाही त्यांनी आपल्या कार्यालयातून अधिकारी राजेश प्रभु – साळगावकर यांच्या हस्ते आपला शोक संदेश पाठविला होता.”हत्ती खूप असतात, ऐरावत एकच असतो!” – ज्येष्ठ कलाकार, दिग्दर्शक श्रीरंग देशमुख

“माझ्या आयुष्यातील २ विद्यापीठांपैकी दुसरेही आता हरपले! पं. सत्यदेव दुबे ज्यांनी २ शब्दांची ताकत शिकवली आणि आता मा. विक्रमजी. ज्यांनी दोन शब्दांच्या मधल्या जागेची ताकत समजावली!!” – सह संयोजक भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ, महाराष्ट्र आणि संचालक अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स, मुंबई विद्यापीठ

“कला म्हणजे रियाज” हे ज्यांनी शिकवले, ते विक्रमजी – माझे “साहेब” आज आपल्यात नाहीत, हे मन मानत नाही!!” – ज्येष्ठ रंगकर्मी, लेखक नारायण जाधव

Related posts

जल निगम द्वारा सड़क किनारे खोदा गया गढ्ढा मौत को दे रहा है दावत

Bundeli Khabar

बोरिवली में राइफल शूटिंग आर्चरी और तीरंदाज़ी स्पोर्ट्स क्लब का उद्घाटन

Bundeli Khabar

तन्नू मल्लाह एचएससी में 97.5 प्रतिशत से उत्तीर्ण

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!