29.4 C
Madhya Pradesh
May 5, 2024
Bundeli Khabar
Home » संत गाडगे महाराज धर्मशाळेस देवीसिंग शेखावत यांची भेट
महाराष्ट्र

संत गाडगे महाराज धर्मशाळेस देवीसिंग शेखावत यांची भेट

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : विदर्भ सेवा मंडळ, मुंबईचे प्रमुख विश्वस्त मा. देवीसिंग शेखावत यांच्या भेटी दरम्यान गाडगे महाराज धर्मशाळा, परळच्या कामकाजाची माहिती देताना विश्वस्त हेमंत सुधाकर सामंत, सोबत गजानन नागे उपस्थित होते. आज (४ डिसेंबर) शेखावत यांच्या हस्ते रुग्ण तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि रुग्णांना फळे आणि दूध वाटप करण्यात आले.
गाडगे महाराजांच्या मुंबईतील पाचही धर्मशाळांचे कामकाज समजून घेऊन आपल्याला समाधान वाटले असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे आयोजन दादर धर्मशाळा येथे केले होते. आपल्या मनोगतात शेखावत यांनी आपल्या बालपणीच्या आठवणि सांगितल्या. आमच्या गावात बाबा येत आणि मला त्यांच्या मांडीवर बसण्याचा योग आला. आमच्या परिसरातील नवकोट नारायण मानले गेलेल्या राठोड आणि तेलंगी यांची बाबांवर खूप श्रद्धा होती आणि बाबा जे सामाजिक कार्य सांगत ते या व्यक्ती आपल्या पैशाने उभे करत अशा अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला. आता सामाजिक क्षेत्रात संस्था चालवायला पैसे पण खूप मिळतील मात्र निस्पृह व्यक्ती मिळणे कठीण अशी परिस्थिती असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. दादासाहेब देशमुख, गुणवंतराव चराटे, शिंदेबाबा या बाबांच्या सहकाऱ्यांच्या त्यांनी आठवणी सांगितल्या.
कार्यक्रमाचे उत्तम संयोजन प्रशांत देशमुख यांनी केले. जे. जे. धर्मशाळेचे विश्वस्त एकनाथ ठाकूर यांनी किती आर्थिक अडचणींवर मात करत दादर धर्मशाळा उभी झाली हे स्पष्ट करत त्या काळी धनिक लोक कसे मध्यरात्री उभे राहून चांगल्या कामाला दान देत याची आठवण सांगितली. देवीसिंग शेखावत यांनी या वास्तूत येऊन मी भारावून गेलो असे सांगत कार्यक्रम संपल्यावरही तासभर धर्मशाळेत वावरून रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी केली आणि सर्व धर्मशाळांच्या कार्याची माहिती घेतली आणि बाबांची जन्मभूमी असलेल्या विदर्भ भागातील आमची संस्था आपल्या कायम पाठीशी उभी असेल असे आश्वासन दिले. विदर्भ सेवा मंडळाचे सुधाकर साबळे, उमेश धानोरकर आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

Related posts

जिल्ह्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी ११ नोव्हेंबर पासून लसीकरण विशेष सप्ताह

Bundeli Khabar

अनुज डान्सिंग सेन्सेशन मिथुन चक्रवर्ती मध्ये बदलला

Bundeli Khabar

“आझादी का अमृत महोत्सव” अंतर्गत लघुवाद न्यायालयात व्याख्यान

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!