22.1 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
IMG 20221009 WA0028
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या बीकेसीतील दसरा मेळाव्याचा खर्चाचा स्रोत काय: चौकशीसाठी उच्च न्यायालयात याचिका

Bundelikhabar

6 / 100 SEO Score

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नोंदणी नसलेल्या गटाने वांद्रे – कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदानावर आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. हे पैसे कुठून आणले ? त्यांना ते कोणी उपलब्ध करून दिले ? असा प्रश्न फौजदारी याचिकेद्वारे उपस्थित करण्यात आला आहे. तसेच शिंदे यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी आणि प्राप्तिकर कायद्याच्या तरतुदींअंतर्गत चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते दीपक जगदेव यांनी वकील नितीन सातपुते यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली असून त्यात सीबीआय किंवा मुंबई पोलिसांचा आर्थिक गुन्हे विभाग किंवा अंमलबजावणी संचालनालयासारख्या (ईडी) केंद्रीय यंत्रणांना या निधीच्या चौकशीचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्याच्या विविध भागातून शिंदे समर्थकांना वांद्रे – कुर्ला संकुलापर्यंत आणण्यासाठी एसटीच्या १८०० बसगाड्या आरक्षित करण्यात आल्या होत्या. परिणामी ग्रामीण भागांतील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. याचीही चौकशी करण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.


Bundelikhabar

Related posts

विधायिका भारती लावेकर ने किया ‘कैमराबाज़’ चैनल का उद्घाटन

Bundeli Khabar

महाराष्ट्र अपघात मुक्त करण्यासाठी सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावे – डॉ.मनीलाल शिंपी

Bundeli Khabar

अमृत महोत्सवी वर्षात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना गती द्यावी – सुधीर मुनगंटीवा

Bundeli Khabar
error: Content is protected !!