28.2 C
Madhya Pradesh
September 28, 2026
Bundeli Khabar
IMG 20220817 WA0002
महाराष्ट्र

लघुवाद न्यायालयात ६६ खटले निकाली

Bundelikhabar

9 / 100 SEO Score

*एमटीएनएलची ८.५ लाखांची वसूली*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : राष्ट्रीय लोकअदालत अंतर्गत लघुवाद न्यायालयात ६६ प्रकरणे निकालात निकाली. तसेच मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत ठेवण्यात आलेल्या महानगर टेलिफोन निगमच्या १११ प्रकरणांचा निकाल लागून ८,४७,९१५ रुपयांची वसूली झाली. त्यामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या खटल्यातील न्यायप्रक्रियेतील कार्याला या उपक्रमामुळे गती येत असल्याचे दिसून येत आहे.

लघुवाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अभय वाघवसे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालतचे काम यशस्वी झाले. अतिरिक्त मुख्य न्यायाधीश एम. एन. सलीम, तदर्थ जिल्हा न्यायाधीश एस. एस. देशपांडे, न्यायाधीश सर्वश्री एस. एस. कदम, एम. एस. अग्रवाल, आर. बी. पारवेकर, डी. एस. दाभाडे, ए. एम. कुलकर्णी, के. आय. खान, आर. आर. खान व ए. बी. होडावडेकर तसेच वकील सर्वश्री असिफ ए. आर. शेख, सरिता खैरकर, डी. पी. चाचा, मदनेश सिंग, श्वेता चुरी, अपर्णा म्हात्रे, अशफाक शेख, पंकज ठक्कर तसेच सामाजिक कार्यकर्ते सर्वश्री शंकर परब, नफीसा शमीम, अनिता कदम, अशोक शिंदे, प्रतिक्षा विचारे, सिद्धी चव्हाण, अविनाश पांड्ये, अनिल गणाचार्य यांनी काम पाहिले. लोकअदालतचे यशस्वी आयोजन अप्पर प्रबंधक निलम शाहीर, मीना शृंगारे, अतुल राणे व कर्मचारी वृंद यांनी केले.


Bundelikhabar

Related posts

मातृ दिवस पर अग्निशिखा का कवि सम्मेलन व सम्मान समारोह सम्पन्न

Bundeli Khabar

कल्याण एपीएमसी मधील व्यापाऱ्यांनाही तातडीने नुकसान भरपाई द्या – डाॅ. वंडारशेठ पाटील

Bundeli Khabar

स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफीग्रस्त आजारावरील उपचाराच्या सुविधेमुळे रुग्णांना नवजीवन- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Bundeli Khabar
error: Content is protected !!