22.9 C
Madhya Pradesh
October 28, 2026
Bundeli Khabar
IMG 20221009 WA0027
महाराष्ट्र

जगण्याचे आर्त काव्यसंग्रहाचे रामदास फुटाणे यांच्या हस्ते प्रकाशन

Bundelikhabar

6 / 100 SEO Score

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ‘जगण्याचे आर्त’ ह्या विजय अर्जुन सावंत यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन आज परळच्या दामोदर हॉलमध्ये महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे ह्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, संभाजी भगत, भाई मयेकर आणि निरजा हेदेखील उपस्थित होते. दि सोसल सर्वीस लीग, मुंबईच्या शतक महोत्सवानिमित्त महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी नारायण सुर्वे यांना आदरांजली देण्यासाठी कवितांच्या कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच हा प्रकाशन सोहळा पार पडला.

सिंधुदुर्गातील कवी विजय सावंत यांचा ‘जगण्याचे आर्त’ हा नवीन कवितासंग्रह प्रभा प्रकाशन, कणकवली यांच्यातर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. या कवितासंग्रहाला ज्येष्ठ कवी अजय कांडर आणि प्रवीण बांदेकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर प्रस्तावना डॉ. गोविंद काजरेकर यांनी लिहिली आहे. या कवितासंग्रहाचे लक्षवेधक मुखपृष्ठ संदेश भंडारे यांनी तयार केले आहे. या कवितासंग्रहातील कवितांमधून विजय सावंत यांनी आपल्या सभोवताली घडणार्‍या घटनांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून भाष्य केले आहे. त्यामुळे कवितेच्या अधिक प्रगल्भतेच्या दिशेने होणारा प्रवास आपल्याला अनुभवता येऊ शकतो.
कवी विजय सावंत हे कुंब्रल – दोडामार्गचे सुपुत्र असून समाजसेवा हायस्कूल, कोलझर व आर.पी.डी. महाविद्यालय व श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. ते सध्या दि सोसल सर्वीस लीग, मुंबईत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
विजय सावंत यांचा २०१३ साली ‘ प्रकाश किरणांच्या शोधात ‘ हा कवितासंग्रह को.म.सा.प.च्या दादर शाखेतर्फे मधु मंगेश कर्णिक, यशवंत देव, डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांच्या हस्ते प्रकाशित झाला होता. दोन वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या ‘सिंधुदुर्गातील आजची कविता’ या प्रातिनिधिक कवितासंग्रहातही त्यांच्या कवितांचा समावेश होता.


Bundelikhabar

Related posts

टिकट निरीक्षक की कोशिश से दो नाबालिग सुरक्षित अभिभावक को सौंपे

Bundeli Khabar

गुजरात के राज्यपाल आचार्य देवव्रत ने की जागरूकता मिशन शी (SHE) की शुरुआत

Bundeli Khabar

कल्याण आर एस पी युनिट च्या माध्यमातून झकारिया एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट च्या सौजन्याने सांगली जिल्ह्यातील 200 पूरग्रस्तांना कपडे,रेशन आणि भांडी वाटप

Bundeli Khabar
error: Content is protected !!