31.9 C
Madhya Pradesh
May 19, 2024
Bundeli Khabar
Home » सर्वांच्या प्रयत्नामुळे माझा मुलगा सुखरूप घरी पोहोचला- सोन्या पाटील
महाराष्ट्र

सर्वांच्या प्रयत्नामुळे माझा मुलगा सुखरूप घरी पोहोचला- सोन्या पाटील

युक्रेन वरून मुलगा सुखरूप घरी परतला आणि आई-वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला

भिवंडी : युक्रेन मध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेला कु.प्रितम सोन्या पाटील हा सुखरूप घरी परतल्या नंतर ठाणे जिल्ह्यात समाजसेवक म्हणून ओळखले समज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धर्म सेवक म्हणून समजले जाणारे वडील श्री. सोन्या काशिनाथ पाटील व त्यांची पत्नी सौ शोभा सोन्या पाटील यांच्या अश्रूंचा बांध फुटला अत्यंत हृदयद्रावक दृश्य पहिल्या नंतर  तेथे प्रितमच्या स्वागतासाठी उपस्थित सर्वांचेच डोळे आनंदअश्रूंनी डबडबले. 
भिवंडी शहरातील कु. प्रितम सोन्या पाटील हा पश्चिम युक्रेन भागातील लविव असलेल्या डायनलो हलेसकी लविव नॅशनल मेडिकल कॉलेज या ठिकाणी ५ व्या वर्षात  वैद्यकीय (MBBS)शिक्षण घेत होता .युद्धाचा झळा त्या शहरात कमी जाणवत असला तरी रात्र त्याना बंकरमध्ये जागून काढावी लागत होती. दरम्यान भारतीय दुतावासा कडून या विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी कोणती ही हालचाल दिसून न आल्याने तब्बल ११० विद्यार्थ्यांनी खाजगी बस च्या  माध्यमातून १ मार्च २०२२ रोजी लविव शहर सोडले. २६ तासाच्या खडतर प्रवासानंतर हंग्री या देशाच्या सीमेवर येऊन सर्व विद्यार्थी पोहोचले.त्या ठिकाणी श्री श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिविंग  या सेवाभावी संस्थेच्या आश्रमात या मुलांची मोफत राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती . या ठिकाणी विद्यार्थी असल्याची माहिती भारतीय दूतावासास नसल्याने मुलांना  तीन दिवस या ठिकाणी अडकून राहावे लागले, त्यानंतर मुलांनी दूतावासात मागणी करून आम्हाला ही मायदेशी जायचे आहे असा तगादा लावल्याने ७/३/२०२२ रोजी कु.प्रितम पाटील सह शेकडो विद्यार्थी दिल्ली मार्गे आपापल्या घरी पोहोचले आहेत, त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील कु.प्रितम सोन्या पाटील या विद्यार्थ्यांचा देखील समावेश होता.
शिक्षण पूर्ण होत आलं असतानाच मायदेशी निघून यावे लागले याचे दुःख मनात असले तरी सुद्धा युक्रेनवरील हल्ल्यात भयान झालेली परिस्थिती बघितल्यानंतर मायदेशी परत येण्याची ओढ देखील तेवढीच प्रत्येक भारतीय विद्यार्थ्यांना लागली होती, आणि अशा खडतर प्रवासानंतर आज कु.प्रितम पाटील घरी सुखरूप परतल्याने खरा आनंद वडील श्री. सोन्या पाटील आई सौ शोभा पाटील, काका जयवंत पाटील , भाऊ प्रितेश पाटील ,व सर्व कुटुंबीयांचा गगनात मावेनासा झाला आहे, पुढील शिक्षण कसे पूर्ण होणार याची चिंता जरी असली तरी सुद्धा मी आज माझ्या कुटुंबियांच्या सानिध्यात सुखरूप पणे पोहचलो , म्हणून मी खरंच आनंदित आहे अशी प्रतिक्रिया कु. प्रितम सोन्या पाटील यांनी यावेळी दिली.तर यूक्रेन येथील युद्धा ची खबर जसजशी कानावर पडत होती तसतसा काळजाचा ठोका चुकत होता, मात्र सगळ्यांच्या प्रयत्नाने माझा मुलगा कु. प्रितम पाटील घरी पोहचला तसेच त्याच्या सोबत असणारे सर्व विद्यार्थी ही सुखरूप आपापल्या घरी पोहोचले, अशी हृदयस्पर्शी भावनात्मक प्रतिक्रिया धर्मसेवक श्री.सोन्या पाटील यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरणशी बोलताना दिली.
कु.प्रितम सोन्या पाटील हा आपल्या घरी सुखरूप पोचल्याचे समजले असताच शिवसेना तालुकाप्रमुख श्री विश्वास स्थळे यांनी सपत्नीक सोन्या पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन शिवसेना भिवंडी तालुका ,व सह्याद्री नागरी पतसंस्थेच्या वतीने कुमार प्रितम पाटील याचे पेढे भरऊन स्वागत केले, तसेच दैनिक स्वराज्य तोरण मित्र परिवार व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभागाच्या वतीने संपादक दैनिक स्वराज्य तोरण डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील व श्री. संजय महादेव भोईर अध्यक्ष (महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ भिवंडी मनपा क्षेत्र) यांनी कुमार प्रितम पाटील याचे निवास्थानी जाऊन स्वागत केले.

Related posts

धर्मादाय आयुक्तांची सामाजिक बांधिलकी

Bundeli Khabar

डॉ.मनीलाल शिंपी यांचा आदर्श नंदुरबार जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा-डॉ. किशोर पाटील

Bundeli Khabar

टाटा आयपीएल – राजस्थानचा रॉयल विजय

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!