22.4 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » स्वधा संस्था सोशल अप्लिफ़मेन्ट एंड डेव्हलपमेंट फ़ॉर हेल्थ ॲक्शन कल्याण यांच्या सौजन्याने व आर एस पी युनिट यांच्या सहकार्याने नेत्र तपासणी शिबिराची पडघा टोलनाका येथे सांगता
महाराष्ट्र

स्वधा संस्था सोशल अप्लिफ़मेन्ट एंड डेव्हलपमेंट फ़ॉर हेल्थ ॲक्शन कल्याण यांच्या सौजन्याने व आर एस पी युनिट यांच्या सहकार्याने नेत्र तपासणी शिबिराची पडघा टोलनाका येथे सांगता

कल्याण : विविध समाज जागृतीचे उपक्रम राबवीणाऱ्या स्वधा संस्थेच्या वतीने बुधवार दिनांक ४/३/२०२२ व ५/३/२०२२ रोजी माणकोली नाका वाहतूक कार्यालय येथे नेत्र तपासणी शिबीर व चष्मे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,तर सोमवार दि.७/३/२०२२ व मंगळवार दि.७/३/२०२२रोजी अंजुर फाटा खारबाव रोड या ठिकाणी करण्यात आला होता, तसेच या शिबिराचा शेवट पडघा टोल नाका येथे बुधवार दि.९/३/२०२२ रोजी करण्यात आला. यावेळी पडघा ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री अभिषेक नागवेकर, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील , आर. एस.पी ठाणे जिल्हा युनिटचे कमांडर डॉ.श्री.मणिलाल रतिलाल शिंपी, व आदी मान्यवर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी नेत्र तपासणी साठी श्री विठ्ठल बडे (उपाध्यक्ष – शासकीय नेत्र चिकित्सा अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य) श्री. शशिकांत पाटील (सहाय्यक नेत्र चिकिस्तक )श्री.सागर लोटवानी (टेक्निशियन) यांनी काम पाहिले. सदर शिबिरात सतत सात दिवसात एकूण ८५४ रुग्णांची तपासणी करून त्यांना चष्मे वाटप करण्यात आले असल्याची माहिती यावेळी मोनाली रॉय यांनी दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना दिली. नेत्र तपासणी चष्मे वाटप शिबिर हे ९ मार्च २०२२ तारखेपर्यंत भिवंडीत विविध ठिकाणी सतत सात दिवस सुरू होते त्यामुळे वाहनचालकांना मोफत तपासणी करून चष्मे वाटप करण्यात आले असल्याची माहिती स्वधा संस्थेच्या अध्यक्षा ईवा अथाविया यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना दिली. सदर नेत्र चिकित्सा शिबीर व चष्मे वाटप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
स्वधा संस्था सोशल अप्लिफ़मेन्ट एंड डेव्हलपमेंट फ़ॉर हेल्थ ॲक्शन कल्याण यांच्या सौजन्याने व आर.एस.पी .युनिट कल्याण-ठाणे , तसेच दैनिक स्वराज्य तोरण चारीटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने यशस्वी झाले. हा संपूर्ण शिबिर यशस्वी करण्यासाठी, संस्थेच्या अध्यक्षा ईवा अथाविया यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सभासद मोनाली रॉय, तेसी फ़्रेडी, कौशिक मजुमदार, मोहित ठाकूर, शिवाजी भोईर, छाया गरुड ,प्रितेश शेलार यांनी विशेष मेहनत घेतली.

Related posts

ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेसची डिजीटल सदस्य नोंदणी आढावा बैठक संपन्न

Bundeli Khabar

कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

Bundeli Khabar

विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठी भाषा विधेयक मंजूर

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!