22.6 C
Madhya Pradesh
September 12, 2026
Bundeli Khabar
IMG 20220313 WA0025
महाराष्ट्र

ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेसची डिजीटल सदस्य नोंदणी आढावा बैठक संपन्न

Bundelikhabar

युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस पदी प्रचंड मतांनी निवडून आल्याबद्दल विरेन चोरघे यांचा विशेष सन्मान

भिवंडी : ठाणे ग्रामीण काँग्रेस जिल्हा कमिटीच्या वतीने हॉटेल वाटिका येथे डीजीटल सदस्य नोंदणी व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत आढावा बैठक राष्ट्रीय काँग्रेस सचिव बी.एम.संदीप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
जिल्हाध्यक्ष श्री. दयानंद मोतीराम चोरघे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व तालुक्यात डिजीटल नोंदणीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. त्यामध्ये जास्त नोंदणी करणारे टॉप फाईव्ह योगेश पाटील,रंजन येडवनकर,भरत भोईर,रोहित प्रजापती,महेश धानके या पदाधिका-यांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला.

तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदी प्रचंड मतांनी निवडुन आलेले कु. विरेन चोरघे,जिल्हा अध्यक्ष असगर खान,विधानसभा अध्यक्ष अंकुश भोईर,वसीम खान,हर्षद भोईर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी ठाणे जिल्हा प्रभारी सुभाष कानडे,सह प्रभारी निलेश पेंढारी व माजी खासदार सुरेश टावरे प्रमुख मार्गदर्शन म्हणुन उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश धानके,रवींद्र परटोले,पंकज गायकवाड यांनी केले.आढावा बैठकीस तालुका व जिल्ह्यातुन अनेक कार्यकर्ता पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Bundelikhabar

Related posts

दिशादर्शक नाम फलकात अटाळी आंबिवली या गावाच्या नावांचा समावेश करण्याची मनसेची मागणी

Bundeli Khabar

अज्ञानता, मनोविकार और दुर्गुणों से मुक्त होना ही सच्ची शिवरात्री मनाना है – भगवान भाई

Bundeli Khabar

मैक्सहब ने पाम एवी-आईसीएन एक्सपो 2022 में पेश किए इंटरैक्टिव समाधान

Bundeli Khabar
error: Content is protected !!