जागतिक महिला दिनानिमित्ताने राहणाळ गावात होम मिनिस्टर स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील राहनाळ जिल्हा परिषद गटाच्या ठाणे जिल्हा परिषद सदस्या सौ. सपना राजेंद्र भोईर व भिवंडी पंचायत समितीच्या सदस्या सौ.ललिता प्रताप पाटील यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राहणाळ गावातील बचत गट व महिला मंडळाच्या महिलांसाठी खास होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करून सदर स्पर्धा ही मोठ्या उस्ताह पूर्ण वातावरनात नुकताच संपन्न झाली. या स्पर्धेत विजेत्या महिलांना पैठणी व लकी ड्रॉ द्वारे बक्षिसे देण्यात आली।
सदर स्पर्धेत एकूण ४०० महिलांनी आपला सहभाग नोंदवला होता. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून भिवंडी पंचायत समितीच्या माजी सभापती तथा विद्यमान सदस्या सौ ललिता प्रताप पाटील यांच्या विशेष फंडातून गावातील कचरा सुरक्षित ठेवण्यासाठी कचराकुंड्याचे वाटप मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले, सदर स्पर्धेत विशेष करून ज्येष्ठ महिलांना सन्मानित करून त्यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन पूजन करून करण्यात आले, त्यामधे श्रीमती सुधा पाटील, कलावती पाटील, विठाबाई पाटील, विजया चौधरी,रंजना गायकवाड (माजी सरपंच) शिल्पा पाटील ,सुलोचना पाटील, अरुणा पाटील (अध्यक्ष सकाळ तनिष्का गट )मैनावती नाईक, निर्मला पाटील, वसुदा माळी, सुगंधा पाटील ,मिराबाई पाटील, प्रेमाबाई मढवी, बेबीबाई भोईर, सुमी बाई तरे, प्रभावती माळी व मोठ्या संख्येने इतर महिलांचा समावेश होता।
चूल आणि मूल यापलीकडे आपण कधी गेलो नाही मात्र आता आपणा सर्वांना स्वतंत्र मिळाले आहे, ५०% आरक्षण आहे, त्यामुळे आजची महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकते असे ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या माजी सभापती तथा विद्यमान सदस्या सौ.सपना राजेंद्र भोईर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले, या स्पर्धेसाठी विशेष प्रमुख पाहुणे म्हणून राहणाळ ग्रामपंचायतीचे सरपंच श्री राजेन्द्र पांडुरंग मढवी, माजी सरपंच श्री राजेंद्र गोपिनाथ भोईर, ग्रामपंचायत सदस्य श्री. पंकज पाटील व आदी मान्यवर उपस्थित होते, या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मनोहर तरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.ललिता प्रताप पाटील यांनी केले. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. सपना राजेंद्र भोईर ,सौ.ललिता प्रताप पाटील ,महिला मंडळ सदस्या बचत गटाच्या महिला यांनी विशेष मेहनत घेतली।

