26.4 C
Madhya Pradesh
September 12, 2026
Bundeli Khabar
IMG 20220208 WA0002
महाराष्ट्र

कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

Bundelikhabar

प्रमोद कुमार
डोम्बिवली :- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने १४२ कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील मलंग गड परिसरातील २२ गावात युवक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी कल्याण पूर्व विधानसभेचा आढावा घेण्यात आला. ही बैठक ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष सुधीर वंडारशेठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी जिल्हा मध्यवर्ती कार्यालय कल्याण येथे पार पडली.

या बैठकीत कल्याण पूर्व विधानसभेतील बुर्दुल गावचे सरपंच सुनील पाटील यांची राष्ट्रवादी युवक ठाणे जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. त्याच बरोबर कल्याण पूर्व विधानसभा व अंबरनाथ तालुका ग्रामीण भागातील तब्बल ७० पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

तसेच ठाणे युवक जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी गृहनिर्माण मंत्री तथा संपर्कमंत्री ठाणे जिल्हा जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कल्याण दौऱ्याविषयी माहिती देऊन कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्राचा आढावा घेतला.

याप्रसंगी ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष सुधीर वंडारशेठ पाटील, प्रशांत नगरकर, विश्वास आव्हाड, अंकुश पाटील, विजय काठवले, कैलास शेंद्रे, हृतिक पाटील, भावेश सोनवणे, रोहन साळवे, ओम सावंत, प्रतिक सांगळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Bundelikhabar

Related posts

वॉकहार्ड फाउंडेशन शाइनिंग स्टार अवार्ड से सम्मानित हुए प्रभावशाली लोग

Bundeli Khabar

अकबर ट्रॅव्हल्सवर आयआरसीटीसीचे तिकीट एजंट बनून दरमहा ८०,००० रुपये कमवा

Bundeli Khabar

दक्षिण एशिया के पत्रकारों का संगठन ‘सारा’ के राष्ट्रीय संयुक्त सचिव पद पर जीतु सोमपुरा की नियुक्ति

Bundeli Khabar
error: Content is protected !!