28.2 C
Madhya Pradesh
September 28, 2026
Bundeli Khabar
IMG 20220217 WA0002
महाराष्ट्र

आमदार विश्वनाथ भोईर यांच्या कल्याण पश्चिम मतदार संघात विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरूच

Bundelikhabar

पंचशील नगर साठी 13 लाख तर गाळेगाव हिंदी शाळेजवळील परिसरासाठी 20 लाख रुपये निधी मंजूर

कल्याण : आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतील विकास कामांच्या भूमिपूजनाचा धडाका सुरूच असून आज मोहने येथील वार्ड क्रमांक 12 येथे दोन विकास कामांचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रातील बल्याणी, अटाळी, आंबिवली, मांडा, टिटवाळा, मोहने, गाळेगाव आदी विभागामध्ये आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतून विविध विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरूच आहे.

गेल्या महिन्यात वार्ड क्रमांक ११ बल्याणी येते आमदार विश्वनाथ भोईर यांनी वैष्णव माता मंदिर ते दुबे चाळ येथील डांबरीकरण रस्त्याच्या कामाचे उद्घाटन केले होते त्या कामाची आज पुर्तता झाली असून सदरील रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. आमदार विश्वनाथ भोईर यांच्या कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रात विविध विकास कामांचे उद्घाटन होत असून आज वार्ड क्रमांक १२ येथे दोन कामांचे उद्घाटन झाले आहे, पंचशील नगर येथील साहेबराव कांबळे यांचे निवासस्थान ते प्रमोद गायकवाड यांचे निवास स्थानापर्यंत संपूर्ण रस्त्याचे सिमेंट काँक्रिट रस्ता तयार करणे या 13.20 लक्ष रुपयांच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. तर राज्याचे नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदार निधीतून वीस लाख रुपये हिन्दी शाळेजवळील परिसरातील गटारे व पाय वाटा बनविण्याकरिता मंजूर करण्यात आले या दोन्ही कामाचे शुभारंभ आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी उपशहरप्रमुख विजय काटकर माजी नगरसेवक तथा अ प्रभाग क्षेत्र सभापती दयाशंकर शेट्टी, उपविभागप्रमुख अंकुश जोगदंड, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य मयुर पाटील, समाज सेवक राम तेरे, शाखाप्रमुख राजेश पाटील, रोहन कोट, नित्यानंद नायर, दिनेश निकम राकेश पाटील ज्येष्ठ नागरिक आर डी गायकवाड, गुणाजी मगर, साहेबराव कांबळे, एकनाथ साळवे, यांसह पंचशील नगर येथील अनेक ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.


Bundelikhabar

Related posts

मुम्बई लोकमान्य तिलक टर्मिनस आरपीएफ थाना अध्यक्ष केशव राणा द्वारा पर्यावरण को स्वच्छ रखने के लिए वृक्षा रोपण किया गया

Bundeli Khabar

पालघर जिल्हा माहिती कार्यालयाच्या, नवीन जागेचे काम प्रगतीत

Bundeli Khabar

डॉ.सदानंद पाटील यांच्या अमृत महोत्सवी पुस्तक प्रकाशनाचे भाग्य मला मिळावे – ना.कपिल पाटील

Bundeli Khabar
error: Content is protected !!