35.4 C
Madhya Pradesh
May 19, 2024
Bundeli Khabar
Home » संपादक किशोर पाटील यांना पत्रकार क्षेत्रातील मानद डॉक्टरेट मिळवण्याचा पहिला मान
महाराष्ट्र

संपादक किशोर पाटील यांना पत्रकार क्षेत्रातील मानद डॉक्टरेट मिळवण्याचा पहिला मान

राज भवनात राज्यपालांच्या शुभहस्ते स्वराज्य तोरण वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन!

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भिवंडी तालुक्यातील कैलास नगर बेलपाडा या छोट्याशा गावातील ह. भ. प. बळीराम दादाजी पाटील व ह. भ. प. पार्वतीबाई बळीराम पाटील या शेतकरी दांपत्यांचे सुपुत्र किशोर बळीराम पाटील हे गेली २७ वर्ष पत्रकारिता करत असून ते स्वराज्य तोरण दैनिकाचे संपादक आहेत. तसेच ते महाराष्ट्र शासनाचे अधिस्वीकृतीधारक पत्रकार आहेत. त्याचप्रमाणे ते महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्यस्तरीय सदस्य आहेत. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सरचिटणीस आहेत. विविध शासकीय समित्यांवर सदस्य आहेत. मागील १४ वर्ष पत्रकारिता व १३ वर्ष दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक म्हणून काम करीत आहेत. त्यांनी आपल्या लेखणीतून सामाजिक बांधिलकी जपत निःपक्षपाती राहून सर्व समाज बधावांच्या अनेक समस्या सोडवून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. मार्च २०२० पासून पत्रकारांना कोव्हिड-१९ काळात मोलाचे सहकार्य
करून ते खंबीरपणे पत्रकारांच्या पाठीशी उभे राहिले व पत्रकारांना मदतीचा हात पुढे केला. याची दखल
घेऊन महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन इन्स्टिट्यूट ऑफ भुवनेश्वर, ओडिसा यांनी पत्रकार क्षेत्रातील मानद डॉक्टरेट मिळविण्याचा पहिला मान संपादक किशोर बळीराम पाटील यांना दिला आहे. त्यांना महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन इन्स्टिट्यूट ऑफ ओडिसा व निती आयोग पुरस्कृत कोरोनायोद्धा समाजसेवा रत्न गौरव पुरस्कार व मानद डॉक्टरेट पदवीने राजभवन मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहिम श्री. भगतसिंग कोश्यारी व महाराष्ट्र राज्य आर. एस. पी चे महासमादेशक डॉ. अरविंद देशमुख यांच्या शुभहस्ते व आर एस पी कल्याण-ठाणे युनिटचे कमांडर तथा महाराष्ट्र राज्याचे ब्रँड अँबेसिडर डॉ. मणिलाल रतिलाल शिंपी यांच्या खास उपस्थितीत स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याचवेळी दैनिक स्वराज्य तोरणच्या १३ व्या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशनही महामहिम राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या शुभहस्ते राजभवन मुंबई येथे करण्यात आले. त्याबद्दल त्यांचे दैनिक स्वराज्य तोरण मित्र परिवार, केंद्रीय पंचायती राज्यमंत्री मा. ना. कपिल पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, सहकार महर्षी तथा शिवसेना तालुका विश्वास थळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष डी. के. म्हात्रे, मा. ना. शांताराम मोरे, मा. आ. महेश चौघुले, मा. आ. रूपेश दादा म्हात्रे, समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष धर्म सेवक डॉ. सोन्या पाटील, ठाणे जिल्हा भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दयानंद चोरघे, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती सुरेश गोपीनाथ म्हात्रे (बाल्या मामा), शिवसेना उपजिल्हाप्रमुख देवानंद थळे, भिवंडी शहर जिल्हा भाजपा अध्यक्ष संतोष शेट्टी, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती कुंदन पाटील, शिवसेना शहराध्यक्ष सुभाष माने, भाजपा तालुकाध्यक्ष पि. के. म्हात्रे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजयजी भोकरे, प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, सरचिटणीस विश्वासराव आरोटे, प्रदेश प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव, कोकण विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे, मुंबई ठाणे जिल्ह्यातील तसेच कोकण विभागातील सर्व पत्रकार संघटना व पत्रकार यांच्यावतीने तसेच ग्रामस्थ मंडळ कैलास नगर वळपाडा व संपूर्ण पाटील
कुटुंबियांच्या वतीने अभिनंदन केले जात आहे.

Related posts

श्री स्वामीनारायण ट्रस्ट कल्याण यांच्या वतीने हजार गरीब गरजु मुलांना पितृपक्ष निमित्त महाप्रसाद

Bundeli Khabar

शिक्षक तथा व्याख्याते स्वप्नील पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त

Bundeli Khabar

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात १,५०० रुपयांची वाढ, मोबाईलही मिळणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!