24.6 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » भिवंडी महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी श्री. मिलिंद पळसुले यांना भारत सेवा रत्न गोल्ड मेडल पुरस्कार प्रदान
महाराष्ट्र

भिवंडी महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी श्री. मिलिंद पळसुले यांना भारत सेवा रत्न गोल्ड मेडल पुरस्कार प्रदान

भिवंडी : भिवंडी महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी श्री. मिलिंद दिवाकर पळसुले यांनी दोन वर्षाच्या कोरोना कालात आपल्या पदाला साजेसे असे चांगले काम करून भिवंडी शहरातील सर्व प्रभाग समिती मधील तसेच इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय व शहरातील अनेक कोव्हिड सेंटरमध्ये पालिकेचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली व त्या संधीचा त्यांनी दुरुपयोग न करता चांगल्या प्रमाणात सर्व डॉक्टर, परिचारिका व अधिकारी आयुक्त, उपायुक्त, महापौर, उपमहापौर व सर्व नगरसेवक यांच्यासोबत राहून चांगले काम केले त्यामुळे त्यांचा महानगरपालिकेच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला होता,
तसेच त्यांनी सर्वांशी
सलोख्याचे संबंध ठेवून आपल्या पदाला साजेसं काम केलं आहे याची दखल घेऊन त्यांना महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन ओडिसा भुवनेश्वरच्या वतीने राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून भारत सेवा रत्न गोल्ड मेडल पुरस्कार डॉ.श्री.मनीलाल शिंपी, डायरेक्टर तथा महाराष्ट्र राज्याचे राजदुत (ब्रँड आंबेसेटर )महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन ओडिसा भुनेश्वर, डॉ. श्री. किशोर बळीराम पाटील संपादक दैनिक स्वराज्य तोरण भिवंडी तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व कोकण विभाग सरचिटणीस, भिवंडी पंचायत समितीचे उप सभापती श्री एकनाथ पाटील, भिवंडी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. अविनाश सज्जन मोहिते, भिवंडी पंचायत समिती तालुका वैद्यकीय अधिकारी श्री. माधव वाघमारे, भिवंडी पत्रकार संघाच्या अध्यक्षा श्रीमती कुसुमताई देशमुख, यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले त्यावेळी आर एस पी अधिकारी श्री जितेंद्र सोनवणे, आर एस पी अधिकारी श्री, शरद बोरसे, तसेच ज्येष्ठ पत्रकार श्री,पंढरीनाथ कुंभार श्री, शरद भसाले,श्री, संजय भोईर श्री, संतोष चव्हाण श्री,राजेंद्र काबाडी, आदी मान्यवर व मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते, उपस्थित सर्व पत्रकारांनी भिवंडी महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी श्री मिलिंद पळसुले यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या…

Related posts

ह्रदयाच्या खोलीत उतरणारी मैत्रीची “ऊंचाई”

Bundeli Khabar

भारतीय बाजार पेठेत चायनीज अगरबत्त्याचा सुळसुळाट सावधानता बाळगा – यशवंत सोरे

Bundeli Khabar

शॉपमॅटिकच्या ‘इन्सायरिंग एंटरप्रिनरशिप प्रोग्राम’ला बळकटी

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!