38.9 C
Madhya Pradesh
May 17, 2024
Bundeli Khabar
Home » शॉपमॅटिकच्या ‘इन्सायरिंग एंटरप्रिनरशिप प्रोग्राम’ला बळकटी
महाराष्ट्र

शॉपमॅटिकच्या ‘इन्सायरिंग एंटरप्रिनरशिप प्रोग्राम’ला बळकटी

संतोष साहू/महाराष्ट्र

व्यापाऱ्यांना १ लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर पेयूद्वारे टीडीआर माफ

मुंबई : आंतरराष्ट्रीय ई कॉमर्सचे सक्षमीकरण करणारे शॉपमॅटिक आपल्या ‘इन्स्पायरिंग एंटरप्रेनरशिप प्रोग्राम’ द्वारे जास्तीत जास्त उद्योजकांना आणि एसएमहीला ऑनलाइन जाण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. ३ जून ते ३१ ऑगस्ट दरम्यान साइन अप करणाऱ्या कुणालाही होस्टिंग शुल्क माफ केले जाणार आहे.
इन्स्पायरिंग एंटरप्रेनरशिप प्रोग्रामच्या अखेरच्या महिन्यात पेयू भारतातील आघाडीचे ऑनलाइन पेमेंट सोल्युशन प्रदाता आणि शॉपमॅटिकचा पेमेंट पार्टनर ऑगस्ट २०२१ मध्ये साइन अप करणाऱ्या सर्व उद्योजकांना १ लाख रुपयांपर्यंत शून्य टीडीआर शुल्क आकारेल. या निर्णयामुळे इच्छुक उद्योजकांना आणि लहान व्यवसाय मालकांना त्यांचा व्यवसाय ऑनलाइन करण्याकरिता विशेषत: या कठिण काळात प्रोत्साहन मिळेल.
९० दिवसांच्या कालावधीत, व्यवसाय मालक प्रत्येक यशस्वी व्यवहारावर केवळ ३% शुल्क देत, शॉपमॅटिकच्या सुविधांचा लाभ घेऊ शकतील. एवढेच नाही तर पेयू पेमेंट गेटवेला दिलेली टीडीआर कपातही वगळू शकतील. याद्वारे त्यांची एकूण मार्जिन वाढेल।


पेयू आणि शॉपमॅटिक २०१९ मध्ये एकाच प्लॅटफॉर्मवर अनेक चॅनेल, डिव्हाइस आणि मोडमधून ग्राहकांचे पैसे विना अडथळा स्वीकारण्यासाठी एकत्र आले. आता पेयू हा ई कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहित करण्याकरिता शॉपमॅटिकच्या या व्यापक उद्दिष्टात सक्रिय योगदान देत आहे.
शॉपमॅटिकचे सीईओ आणि सहसंस्थापक अनुराग अवुला म्हणाले, “भागीदारी सुरु झाल्यापासून पेयूने शॉपमॅटिकच्या व्यापाऱ्यांचे पेमेंटसंबंधी अनुभव वृद्धींगत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. व्यापाऱ्यांकरिता १ लाख रुपयांपर्यंत टीडीआर माफ करत, आर्थिक अनिश्चिततेच्या काळात व्यवसायांना मदत करण्यासाठी ते आमच्या कार्यात सहभागी झाले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त उद्योजक आणि व्यावसायिकांना ऑनलाइन जाण्यासाठी आणि याद्वारे व्यवसाय वृद्धीसाठी मी प्रोत्साहन देतो।

Related posts

व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे नसांच्या आरोग्यावर परिणाम : पीऍण्डजी नर्व्ह हेल्थ सर्व्हे

Bundeli Khabar

रोजगार मेले में कई दिव्यांग हुए लाभान्वित

Bundeli Khabar

कलवा में कोरोना टीकाकरण महोत्सव का आयोजन

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!