28.9 C
Madhya Pradesh
May 19, 2024
Bundeli Khabar
Home » पंचायत समिती भिवंडी चे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री अविनाश मोहिते यांना भारत सेवा रत्न गोल्ड मेडल पुरस्कार प्रदान
महाराष्ट्र

पंचायत समिती भिवंडी चे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री अविनाश मोहिते यांना भारत सेवा रत्न गोल्ड मेडल पुरस्कार प्रदान

भिवंडी : पंचायत समिती भिवंडी चे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री अविनाश मोहिते यांनी दोन वर्षाच्या कोरोना कालात आपल्या पदाला साजेसे असे चांगले काम करून भिवंडी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून दिले आहे ,तसेच कल्याण पंचायत समिती, व भिवंडी पंचायत समिती या दोन्ही ठिकाणी अतिरिक्त गट विकास अधिकारी म्हणून अनेक वेळेला काम करण्याची त्यांना संधी मिळाली व त्या संधीचा त्यांनी दुरुपयोग न करता चांगल्या प्रमाणात सर्व विस्ताराधिकारी व ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवून आपल्या पदाला साजेसं काम केलं आहे व करत आहेत, याची दखल घेऊन त्यांना महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन ओडिसा भुवनेश्वरच्या वतीने राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून भारत सेवा रत्न गोल्ड मेडल पुरस्कार डॉ.श्री.मनीलाल शिंपी
डायरेक्टर तथा महाराष्ट्र राज्याचे राजदुत (ब्रँड आंबेसेटर )महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन ओडिसा भुनेश्वर, डॉ. श्री. किशोर बळीराम पाटील संपादक दैनिक स्वराज्य तोरण भिवंडी तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व कोकण विभाग सरचिटणीस, भिवंडी पंचायत समितीचे उप सभापती श्री एकनाथ पाटील, भिवंडी पंचायत समिती तालुका वैद्यकीय अधिकारी श्री. माधव वाघमारे,भिवंडी महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी श्री. मिलिंद दिवाकर पळसुले, भिवंडी पत्रकार संघाच्या अध्यक्षा श्रीमती कुसुमताई देशमुख, यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले त्यावेळी आर एस पी अधिकारी श्री जितेंद्र सोनवणे, आर एस पी अधिकारी श्री, शरद बोरसे, तसेच ज्येष्ठ पत्रकार श्री,पंढरीनाथ कुंभार श्री, शरद भसाले,श्री, संजय भोईर श्री, संतोष चव्हाण श्री,राजेंद्र काबाडी, आदी मान्यवर व मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते, उपस्थित सर्व पत्रकारांनी भिवंडी पंचायत समिती चे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री अविनाश मोहिते यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या…

Related posts

मातोश्री वेलबाई देवजी हरिया महाविद्याय आणि पुरोगामी विचार मंच महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा

Bundeli Khabar

मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने परभणी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल ला दहा लाख रुपये लाच घेताना रंगेहात पकडले

Bundeli Khabar

पुणे तिथे विमानतळ 15 दिवस राहणार उणे

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!