25.2 C
Madhya Pradesh
October 5, 2024
Bundeli Khabar
Home » मातोश्री वेलबाई देवजी हरिया महाविद्याय आणि पुरोगामी विचार मंच महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा
महाराष्ट्र

मातोश्री वेलबाई देवजी हरिया महाविद्याय आणि पुरोगामी विचार मंच महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा

प्रतिनिधी / संदीप शेंडगे

कल्याण – शहाड – कल्याण येथील मातोश्री वेलबाई देवजी हरिया महाविद्यालयात कोरोनाचे सर्व नियम पाळत बी कॉम आणि एस वायच्या विद्यार्थ्यांना सहभागी करत संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन आयोजन करण्यात आले होते. या वेळी सर्व प्रथम चळवळीतील कायम सक्रीय असणारे मोरे व साळवी दांम्पत्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व संविधानाच्या प्रतीस पुष्प वाहुन कार्यक्रमास सुरुवात केली.

सुरुवातीला विद्यार्थ्यांसह सर्वानी संविधानाच्या प्रस्तावनेचे सामुदायिक वाचन केले. पुरोगामी विचार मंच महाराष्ट्राचे अध्यक्ष बंडु घोडे सर यांनी थोडक्यात प्रस्ताविकेत कार्यक्रमाचा हेतू व महत्व विशद करत संविधानाच्या संबंधित प्रश्न मंजुषेचे मुलांना नियम सांगून योग्य उतर देणा-यांना संविधान पुस्तकांची भेट दिली जाईल असे सांगून प्रश्न मंजूषेला सुरूवात करून पहिले पाच प्रश्न विचारले त्या नंतर अनुक्रमे सचिन साळवी, शरद लोखंडे, डॉ सुषमा बसवंत, यांनी ही प्रश्न विचारले व योग्य उतर देणा-यां विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरुपात संविधानाची पुस्तिका मान्यवरांच्या हस्ते भेट दिली या प्रश्न मंजूषेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

हिरामन खाडे व पुष्पांजली या विद्यार्थ्यांनी चार चार प्रश्नांची योग्य उतरे देवून बाजी मारली.सर्चजण आपापल्या परिने योग्य उतर देण्याचा प्रयत्न करत होते, त्यात काहीना यश आले तर काहींचे थोडक्यात बक्षीस निसटले प्रश्न मंजुषा खुपच मनोरंजक व उत्सुकता निर्माण करणारी झाली.
यातून मुलांसह उपस्थितांच्या मध्ये संविधान जागरूतीचे काम होवून संविधानाच्या संबंधी समज गैरसमज दूर झाले. या नंतर उपस्थित मान्यवरांना काँलेज प्रशासनाच्या वतीने डॉ.मा.गिरीष लटकेसर व प्रिंसिपल कोमल चंदनशिवे व ईतर स्टाफ कडून पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधाना विषयी अतिशय मौलिक मार्गदर्शन आपापल्या मनोगताव्दारे केले.

याप्रसंगी पुरोगामी विचार मंच महाराष्ट्र चे अध्यक्ष मा. बंडु बी घोडेसर सरचिटणीस मा.शरद लोखंडे महिला आघाडी अध्यक्ष मा.डॉ.सुषमा बसवंत,सचिव सचिन साळवी,उपाध्यक्ष मा.सुभास गायकवाड़ संघटक नारायण निंबाळकर, कोकण संपर्क प्रमुख देवेंद्र मोरे, म.आ. संघटक मंगल मोरे,सचिता साळवी ,प्रताप माने आणि पुरोगामी विचार मंच चे इतर मान्यवर सदस्य उपस्थितीत होते. शेवटी संस्थेचे सचिव डॉ.गिरीश लटके यांनी मनोगत व कवितेने अध्यक्षीय समारोप केला. सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभाग प्रमुख पाटील सर व सचिन साळवी यांनी केले तर आभार देवेंद्र मोरे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुरोगामी विचार मंच महाराष्ट्र च्या वतीने व काँलेज प्रशासनाने व सर्व स्टापने प्रयत्न केले.

Related posts

हुनर बिझनेस नेटवर्क तर्फे समाजातील मान्यवरांचा सन्मान सोहळा

Bundeli Khabar

भिवंडी महानगरपालिका व भिवंडी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पाणथळ दिन साजरा

Bundeli Khabar

मुंबईत लालबागमधील वन अविघ्न पार्क इमारतीला मोठी आग

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!