22.1 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
IMG 20210805 WA0016
महाराष्ट्र

मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने परभणी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल ला दहा लाख रुपये लाच घेताना रंगेहात पकडले

Bundelikhabar

महाराष्ट्र / आर्चिस पाटील
परभणी : परभणी जिल्ह्यामध्ये एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्याप्रकरणी सेलू पोलीस ठाणे जिल्हा परभणी येथे गुन्हा नोंद झाला होता. सदर गुन्ह्यांतील मयत व्यक्तीच्या मित्रास आपल्या कार्यालयात बोलावून ” तुझी व्हायरल झालेली क्लिप मी ऐकली असून, यातून तुला मी बाहेर काढेन. त्यासाठी तुला दोन कोटी रुपये द्यावे लागतील ” असे धमकवत होते. मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दहा लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
सदर गुन्ह्यातील मयत आणि त्याच्या पत्नीचे फोनवर झालेले संभाषण हे व्हायरल झाले होते.

त्या व्हायरल झालेल्या ऑडिओ मध्ये मयत व्यक्तीचा मित्रही सोबत होता. त्या व्हायरल झालेल्या ऑडिओ संदर्भात बोलण्यासाठी सेलू पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल यांनी मयत व्यक्तीच्या मित्रास आपल्या कार्यालयात बोलावून ” तुझी व्हायरल झालेली क्लिप मी ऐकली असून, यातून तुला मी बाहेर काढेन. त्यासाठी तुला दोन कोटी रुपये द्यावे लागतील ” असे बोलून मयत व्यक्तीच्या मित्रास वारंवार फोन करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून दोन कोटी रुपयांची मागणी करण्यास सुरुवात केली. यासंदर्भात तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीची पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंध विभागाने तातडीची कारवाई करत आरोपी राजेंद्र पाल वय 55 व पोलीस नाईक गणेश चव्हाण वय 37 यास तक्रारदाराच्या भावाकडून दहा लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले . पुढील कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई करत आहे।


Bundelikhabar

Related posts

टीम ‘अनुपमा’ विरुद्ध टीम ‘गुम है किसी के प्यार मे’ भिडणार “रविवार विथ स्टार परिवार” मध्ये

Bundeli Khabar

शिक्षार्थियों के लिए ‘अपग्रेड’ के भारत में पाँच ऑफलाइन एक्सपीरियंस सेंटर

Bundeli Khabar

बीएमसी का महापौर आम आदमी पार्टी का होगा – प्रीति शर्मा मेनन

Bundeli Khabar
error: Content is protected !!