पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेणारा संघ म्हणजे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ होय -डॉ.श्री. मणिलाल शिंपी
पत्रकारांच्या सुखात नसून जास्त प्रमाणात दुःखात सहभागी होण्याचे काम आम्ही करतो – -डॉ.श्री. किशोर पाटील
पत्रकारांचे कोणतेही प्रश्न असो ते सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे – -डॉ.श्री. अरुण पाटील
पत्रकार संघाचे आरोग्य शिबिर गुरुकृपा हॉस्पिटल नारपोली येथे मोठ्या उत्साहात संपन्न!
भिवंडी : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक आदरणीय श्री संजयजी भोकरे यांच्या आदेशानुसार पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री. वसंतजी मुंडे व प्रदेश सरचिटणीस श्री. विश्वासराव आरोटे यांच्या वाढदिवसा निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य सप्ताह शिबिर घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्या अनुषंगाने कोकण विभागीय अध्यक्ष श्री.नितीन मनोहर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागीय सचिव डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील यांच्या वतीने व गुरुकृपा हॉस्पिटल चे डॉक्टर श्री. अरुण पाटील यांच्या सहकार्याने शिबिराचे आयोजन गुरुकृपा हॉस्पिटल नारपोली येथे करण्यात आले होते. सदर शिबिर हे फक्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातील सदस्यांसाठीच आयोजित करण्यात आले होते, सदर आरोग्य शिबिराचे उद्घाटन राज्यपाल सन्मानित महात्मा गांधी ग्लोबल पीस फाऊंडेशन भुवनेश्वर ओडिसा चे डायरेक्ट तथा महाराष्ट्र राज्याचे राजपूत (ब्रँड अँबेसिडर) तसेच कल्याण ठाणे युनिटचे आर एस पी कमांडर डॉ.श्री. मणिलाल रतिलाल शिंपी यांच्या शुभहस्ते झाले, व या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून श्री स्वामीनारायण ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.श्री. दिनेश भाई ठक्कर, आर.एस.पी अधिकारी श्री.जितेंद्र सोनवणे,भिवंडी पत्रकार संघाच्या अध्यक्षा श्रीमती कुसुमताई देशमुख,श्री.जहीद अन्सारी( संपादक – मालेगाव ) आदी मान्यवर व मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.
सदर शिबिर हे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सचिव तथा दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. आजच्या आरोग्य शिबिराच्या निमित्ताने आरोग्यम् धनसंपदा या ऊक्तीची आठवण झाली, म्हणजेच पत्रकारांच्या आरोग्याची देखील कोणीतरी दखल घेतो हे आज समजले अनेक ठिकाणी आरोग्य शिबिर घेतले जातात, मात्र त्याठिकाणी पत्रकारांच्या कोणत्याच प्रकारे तपासण्या होत नाही, पत्रकार हा फक्त बातमी छापण्या पुरतीच मर्यादित असतो त्याची कधी ही तपासणी होत नाही, असे प्रत्येक वेळी दिसून येते, पत्रकारांच्या आरोग्या बाबत ज्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारींचे निरासन या ठिकाणी केले जाते, उद्या राष्ट्रीय पत्रकार दिन आहे व आज या ठिकाणी पत्रकार बांधवांच्या प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या त्यामुळे उद्या त्यांना कोणताच धोका नाही, विशेष म्हणजे आपणाला कोणालाच रक्तगट माहीत नसतो या ठिकाणी प्रत्येकाचे रक्तगट तपासून त्याची माहिती त्यांना देण्यात आली, हा एक चांगला उपक्रम घेतला त्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार मानतो, तसेच आयोजक डॉ.श्री. किशोर पाटील,डॉ.श्री. अरुण पाटील व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक करतो, कारण पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेणारा संघ म्हणजे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ होय असे यावेळी डॉ.श्री. मणिलाल शिंपी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष श्री वसंत मुंडे व राज्य सरचिटणीस श्री विश्वासराव आरोटे यांच्या वाढदिवसा निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य शिबिरे आयोजीत केली आहेत, त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला आरोग्य शिबिराचे आयोजन आम्ही केले, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा एकमेव उद्देश म्हणजे पत्रकारांच्या सुखात जरी गेलो नाही तरी दुःखात मात्र आपण पोहोचलो पाहिजे असा आहे असे यावेळी डॉ.श्री. किशोर पाटील डॉ.श्री. किशोर पाटील यांनी सांगितले, गेली दोन वर्ष मी पाहत आहे कोरोणा कालावधीच्या काळामध्ये मी सर्व पत्रकारांना जवळून पाहिले आहे की, ते आपल्या आरोग्याची काळजी न घेता दुसऱ्यांच्या दुःखात जीवाची परवा न करता धावताना पाहिले आहे त्यांना माझे एकच सांगणे आहे की आपणही आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून आपले कुटुंब सुखी समाधानी राहील, याठिकाणी आज दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री. किशोर पाटील, यांनी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेक चांगल्या व्यक्तींना माझ्या रूग्णालयात आणले त्यामुळे मी खूप आनंदी आहे , भविष्यात पत्रकार बांधवांना कोणतीही अडचण भासल्यास मी त्यांच्या सदैव सोबत राहीन असे यावेळी गुरुकृपा हॉस्पिटलचे डॉक्टर श्री अरुण पाटील यांनी सांगितले,
गेल्या दोन वर्षांच्या काळात तीन लोकांनी चांगले काम केले त्यामध्ये पोलीस प्रशासन, डॉक्टर व पत्रकार यांचा समावेश आहे. त्यामुळे गंगा जमुना सरस्वती या तीन नद्यांचे एकत्र मिलन झाले असे म्हणायला वावगे ठरू नये, या तिघांना एकत्र करण्याचे काम महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सचिव डॉ.श्री. किशोर पाटील यांनी केले आहे, त्यामुळे त्यांचे मी तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे आभार मानतो असे मालेगाव हुन आलेले संपादक श्री जहीद अन्सारी यांनी सांगितले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आचार्य तथा ग्रुप अध्यक्ष श्री सूरज पाल यादव यांनी केले.
हे आरोग्य शिबीर यशस्वी पार पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्य
मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सचिव डॉ.श्री.किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
भिवंडी शहर महानगरपालिका क्षेत्र सद्स्य, श्री.सूरजपाल यादव, श्री.श्रीनिवास सिरीमल्ले, श्री.गुरुप्रसाद सिंग,श्री.सी. पी. तिवारी,
श्री.मेंहदी हसन मंसूरी,श्री.रेहान खान,
श्रीमती.परवीन खान,
श्री.वेंकटेश रापेल्ली,
श्री.ताज अंसारी,श्री.सोमनाथ ठाकरे, श्री.जगदीश पाताले,
श्री.लवलेश सुतार, श्री.एस बी अंसारी, श्री.अरुण मिश्रा,श्री.जितेन्द्र तिवारी,
सौं.नीलम तिवारी, सौं.रेश्मा अंसारी, श्री. प्रितेश पाटील,
श्री.केतन म्हात्रे, श्री.राज पाठक यांनी विशेष मेहनत घेतली.

