21.9 C
Madhya Pradesh
January 29, 2026
Bundeli Khabar
Home » पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नति मंडळ, भिवंडी संचालित वोक्हार्ट फाऊंडेशन कला व विज्ञान उच्च माध्यमिक आश्रमशाळा – नुतन इमारत उदघाटन व हस्तांतरण समारंभ.
महाराष्ट्र

पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नति मंडळ, भिवंडी संचालित वोक्हार्ट फाऊंडेशन कला व विज्ञान उच्च माध्यमिक आश्रमशाळा – नुतन इमारत उदघाटन व हस्तांतरण समारंभ.

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : रविवार दि.१४ नोव्हेंबर २०२१ (बालदिन) रोजी पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नति मंडळ, भिवंडी संचालित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा परळी, ता.वाडा येथे वोक्हार्ट फाऊंडेशन च्या सौजन्याने कला व विज्ञान शाखांकरीता भव्य व सुसज्ज इमारत बांधून दिली तर रोटरी क्लब ॲाफ बॅाम्बे नॅार्थ च्या सौजन्याने इमारतीतील प्रयोगशाळा, जीमखाना, स्वच्छतागृहे , शुद्ध पेयजलाकरीता आरओ सिस्टीम इत्यादी भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या नवीन वास्तूचे उदघाटन माननीय आमदार व अनुसूचित जमाती कल्याण समितीचे समिती प्रमुख श्री दौलत दरोडा यांच्या हस्ते माननीय संस्थाध्यक्ष श्री विजय जाधव यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी वोक्हार्ट फाऊंडेशनच्या माननीय अध्यक्षा श्रीमती नफिसा खोराकीवाला यांनी नुतन इमारत पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नति मंडळ या संस्थेकडे हस्तांतरीत करीत असल्याची घोषणा केली.
नवीन कनिष्ठ महाविद्यालय व सुसज्ज इमारतीमुळे परळी परिसरातील वंचित विद्यार्थ्यांची पुढील शिक्षणाची सोय झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व आनंद व्यक्त केला. या अशा दात्यांमुळे पद्मश्री अण्णासाहेबांचे शिक्षण प्रसाराचे कार्य पुढे नेण्यास व वाढवण्यास मोलाचे सहकार्य मिळत असल्याची भावना संस्था अध्यक्ष श्री विजय जाधव यांनी व्यक्त केली.
यावेळी संस्था कार्याध्यक्ष श्री.बी.डी.काळे सर, सरचिटणीस श्री.जी.आर.पाटील सर व श्री.रोहीत जाधव सर उपस्थित होते. वोक्हार्ट ग्रुपचे श्री हबील खोराकीवाला, श्री.हुजैफा खोराकीवाला तर रोटरी क्लब च्या वतीने श्री.हेमेन्द्र शाह, श्री.महेन्द्र ठक्कर, श्रीमती रूख्साना खान उपस्थित होते. बी.एन.एन.महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.कल्पना पाटणकर जैन , वाडा पंचायत समिती सदस्य श्री. रघुनाथ माळी, शाळा समितीचे रोहिदास शेलार, जि.प.सदस्य सौ.रोहिनी शेलार, श्री. अशोक गव्हाळे, संस्थेच्या विविध शाखांतील मुख्याध्यापक, शिक्षक – शिक्षकेतर व परिसरातील शिक्षण प्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परळी आश्रम शाळेतील मुख्याध्यापक श्री विरगावकर , श्रीमती थोरात मॅडम, भाई पाटील सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर घागस यांनी केले तर आभार आश्रमशाळा समन्वयक अशोक पाटील यांनी केले.*


Bundelikhabar

Related posts

अनुभव घेऊनच मराठी शाळांची सदिच्छादूत झाले – चिन्मयी सुमीत

Bundeli Khabar

राज्यातील कामगारांचे प्रश्न न सुटल्यास राज्यभर कामगार रस्त्यावर उतरणार – भारतीय मजदूर संघाचा महामोर्चात निर्धार

Bundeli Khabar

कल्याण पूर्वेकडील आरटीओ कार्यालयात वाहनांच्या पासिंगच्या नावाखाली लूट

Bundeli Khabar
error: Content is protected !!