29.4 C
Madhya Pradesh
September 29, 2026
Bundeli Khabar
IMG 20220409 WA0002
महाराष्ट्र

सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचार्‍यांच्या संघटनेची पुनर्रचना

Bundelikhabar

अध्यक्षपदी विश्वास रणदिवे, सचिवपदी शशिकांत सपकाळ

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र राज्य चतुर्थश्रेणी सरकारी कर्मचारी संघटनेशी संलग्न सार्वजनिक बांधकाम विभाग व आमदार निवास येथील चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांच्या संघटनेची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यावेळी राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण आणि मूंबई जिल्हा संघटनेचे सरचिटणीस प्रकाश बने यांच्या मार्गदर्शनाबरोबरच नवनियुक्त सदस्यांचा सत्कार समारंभदेखील फोर्ट येथील बांधकाम भवन येथे आयोजित करण्यात आला. संघटनेच्या अध्यक्षपदी विश्वास रणदिवे आणि सचिवपदी शशिकांत सपकाळ यांची निवड करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता, उप-अभियंता, शाखा अभियंता व इतर वरीष्ठ पदाधिकारी तसेच चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, सरचिटणीस प्रकाश बने, कार्यालय सचिव बाबाराम कदम, कार्यालय प्रमुख मनोहर दिवेकर, कार्यालय सहाय्यक कृष्णा भरडे त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारीवृंद मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.


Bundelikhabar

Related posts

शर्मनाकः पिता ने ही बनाया 9 साल की नाबालिग बच्ची को अपनी हबस का शिकार

Bundeli Khabar

पर्यावरण संरक्षण के लिए राजस्थानी साइकिल बाबा निकले भारत मिशन पर, नमित झवेरी करेंगे समर्थन

Bundeli Khabar

मधु मंगेश कर्णिक यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर

Bundeli Khabar
error: Content is protected !!