29.8 C
Madhya Pradesh
May 4, 2024
Bundeli Khabar
Home » सविधांनामधून डॉ.बाबासाहेब यांना, समाजातील सर्व घटकांना सामाजिक व आर्थिक न्याय अभीप्रेत, सविंधानामधील तरतुदीप्रमाणे सर्वच घटक यांचे आचरण देखील तितकंच महत्वाचे – विधीज्ञ मनीष कानिटकर
महाराष्ट्र

सविधांनामधून डॉ.बाबासाहेब यांना, समाजातील सर्व घटकांना सामाजिक व आर्थिक न्याय अभीप्रेत, सविंधानामधील तरतुदीप्रमाणे सर्वच घटक यांचे आचरण देखील तितकंच महत्वाचे – विधीज्ञ मनीष कानिटकर

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्व समाजात स्वांतत्र्य,समता, बंधुता राहील अशी अपेक्षा आहे, समाजातील सर्व घटक डोळ्यासमोर ठेवून डॉ.बाबासाहेब यांनी घटना लिहिली. सर्व सामान्य घटकातील नागरिक यांना सामाजिक ,आर्थिक, न्याय अभिप्रेत आहे. संवीधान हे सातत्याने वाचले पाहिजे, त्यावर चर्चा झाली पाहिजे, संविधानामधील तरतुदी नुसार नागरिकांचे आचरण देखील तितकेच महत्वाचे आहे असे उद्गार विधीज्ञ मनीष कानिटकर यांनी काढले. वाचन मंदिराच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य 75 वर्ष व संविधानदिननिमित्त व्याख्यान सत्राचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी विधी अभ्यासक मनीष कानिटकर बोलत होते. अध्यक्षस्थानी वाचन मंदिराचे संस्थेचे अध्यक्ष सुधीर सिंगासणे होते. दुसऱ्या वक्त्या वकील कु. मयुरी खरे देखील उपस्थित होत्या. कानिटकर यांनी आपला संविधान निर्मिती व स्वरूप हा विषय मांडताना घटनेची सर्व चौकट नमूद केले मूळ घटनेमध्ये 395 कलम होती. संविधान उद्देशिका हा घटनेचा मूळ गाभा आहे, असे नमूद केले कोणताही कायदा करताना मूळ घटनेच्या विरोधात जाऊन कायदा करता येणार नाही, तसा कायदा केला तर तो घटनाबाह्य होईल व असा हा कायदा रद्द करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला राहील, असे घटनेत नमूद केलेले आहे.घटनेमध्ये भारतीय संघराज्य पद्धती, केंद्राचे अधिकार, राज्याचे अधिकार भारतीय नागरिकत्व आणि राज्याची धोरण निश्चित करण्यात आली आहेत. तसेच सर्व सामान्य नागरिक यांच्या करता देखील समान संधी नमूद करण्यात आली आहे व समान न्यायाची संधी देखील देण्यात आलेली आहे. एखाद्या गरिबाला देखील कायदेशीर मोफत विधी सेवा याची देखील तरतूद घटनेमध्ये करण्यात आलेली आहे. संविधानाप्रमाणे समाज वागत नाही म्हणून समाजात भावनिक व धार्मिक तेढ निर्माण, संघर्ष होतात. समाजातील सर्व घटक यांनी जर संविधानाप्रमाणे आपली वागणूक केली तर बरेचसे प्रश्न कमी होतील, असे देखील कानिटकर यांनी नमूद केले. तर दुसऱ्या वक्त्या कुमारी वकील मयुरी खरे यांनी संविधानात नमूद केलेले मूलभूत अधिकार व कर्तव्य याविषयी विस्तृत विवेचन केले. सामान्य नागरिकांना आपल्या मूलभूत अधिकारांची जाणीव आहे,पण आपली कर्तव्य काय आहे याचा विसर पडत चालला आहे. मूलभूत अधिकार आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवणे देखील आवश्यक आहे. घटनेत प्रत्येक गोष्टींमध्ये आपली कर्तव्य नमूद आहेत. देशाकरता, समजाकरता आपण काय केले पाहिजे हे देखील कर्तव्य आहे. संविधानामध्ये स्पष्टपणे मूलभूत अधिकार आणि कर्तव्य नमूद आहेत.नागरिकांनी संविधानाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आचरण केले तर भारतातील अनेक समस्या दूर होऊ शकतात असे देखील मयूरी खरे यांनी नमूद केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कार्यवाह किशोर नागावेकर, खजिनदार उज्वल कुंभार, सहकार्यवाह मिलिंद पळसुले, ज्ञानेश्वर गोसावी, कार्यक्रम प्रमुख योगेश वल्लाल, ग्रंथपाल सुजाता वडके, प्रणाली खोडे, शलाका मदन यांनी विशेष परिश्रम घेतले।

Related posts

कौशिक जाधव यांना बेस्ट आर्टिस्ट पालघर हा पुरस्कार

Bundeli Khabar

कृष्णा चौहान द्वारा आयोजित मिस बॉलीवुड ऑनलाइन ब्यूटी कांटेस्ट 2022 की विजेता बनी रोज़ खान

Bundeli Khabar

कबीर बेदी, उदित नारायण, अथर्व, पंकज झा, अनिल जॉर्ज और कर्मवीर चौधरी को मिला ‘इंटरनेशनल बुद्धा पीस अवार्ड’

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!