22.4 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » मौजे दहागाव ता. कल्याण जि.ठाणे येथे जनजागरण अभियान अंतर्गत पदयात्रा जनसंवाद सभा संपन्न
महाराष्ट्र

मौजे दहागाव ता. कल्याण जि.ठाणे येथे जनजागरण अभियान अंतर्गत पदयात्रा जनसंवाद सभा संपन्न

किशोर पाटील/महाराष्ट्र
कल्याण : कल्याण तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटी आयोजित जनजागरण अभियान अंतर्गत तालुका कल्याण मौजे दहागाव येथे पदयात्रा आणि जनसंवाद सभेचे आयोजन 26नोव्हेंबर 2021 रोजी संविधान दिनी करण्यात आले .
कल्याण ग्रामीण मध्ये दहागाव येथे घेण्यात आलेल्या या सभेत भाजप सरकारच्या महागाई विरोधात जन जागरण अभियान अंतर्गत संविधान दिनाचे औचित्य साधुन कल्याण ग्रामीण काँग्रेसच्या वतीने जोरदार प्रदर्शन करत भव्य रँलीचे आयोजन व जाहीर सभा संपन्न झाली.

गेल्या सात वर्षात गगनाला
भिडलेली महागाई .मोठ्या प्रमाणात होत असलेली ईंधन,गॅसच्या किमतीत होत असलेली वाढ आणी वाढिमुळे सामान्य मानसाला न परवनारे तसेच कोलमडलेले बजेट या बाबत भाजप सरकारचा समाचार घेवुन अणेक मान्यवरांनी गेल्या सात वर्षातील खाजगीकरण वाढलेली महागाई केवळ व्यापार्‍या धार्जीनी सरचारचा निषेध केला.ज्या सरकारणे केवळ काळे कायदे केले महागाई वाढवली यामुळे पिचलेली जनता ,बेरोजगारी ,बेकारी सरकारची सामान्याला मारक असलेली धोरणे कायद्यांबाबत यावेळी सुतोवाच करण्यात आले.गेल्या सत्तर वर्षात कॉग्रेसने एवढी जुलमी राजवट कधी लागु केली नाही त्यावैळी आंतराष्र्टीय बाजारात त्यावेळी झालैल्या बदलांनीही कधी एवढी ईंधनदर वाढ मनमोहन सींगच्या काळात झाली नाही जेवढी गेल्या सहा ते सात वर्षात झाली.सत्तेचा गैरवापर करुन भाजप सरकारने कायदेमंडळात अणेक कायदे केले ज्या कायद्यांनी केवळ सामान्य मानसाचे नुकसान केले ज्याचे फलीत म्हणजे आता या कायद्यांपैकी तिन कृषी कायदे सद्द करण्याची नामुश्की भाजप सरकारवर आली .

आखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सचिव तथा महाराष्ट्र सहप्रभारी बी एम संदीप साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सर्वप्रथम संविधान पूजन करण्यात आले त्यानंतर कल्याण तालुका अध्यक्ष सोमनाथ मिरकुटे यांनी प्रास्ताविक केले तसेच उपस्थित नागरिकांना संबोधित करताना महागाई विरोधात तसेच इंधन दरवाढ विरोधात जनजागृती करण्यात आली त्यावेळी *जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे साहेब माजी खासदार सुरेश टावरे साहेब ठाणे जिल्हा प्रभारी कानडे साहेब परशुराम पितांब रे चंद्रकांत पाटील यांनी उपस्तीतीतांना संबोधित केले, तसेच अध्यक्षीय भाषणात महागाई तसेच इंधन वाढ गॅस वाढ जनजागृती करणे आवश्यक आहे असे आखिल भारतीय सचिव तसेच *महाराष्ट्र सह प्रभारी बी एम संदीप साहेब* यांनी सांगितले.

आखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या संकल्पनेतून तसेच महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रदेश अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले साहेब यांच्या आदेशाने तसेच जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सदर जनजागरण अभियान राबवण्यात आले त्यावेळी ठाणे जिल्हा प्रभारी सुभाष कानडे साहेब माजी खासदार सुरेश टावरे साहेब महेश धानके शहापूरअध्यक्ष महिला जिल्हाध्यक्ष संगजा मेश्राम मॅडम राकेश पाटील भिवंडी अध्यक्ष दि नेश सासे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सहसचिव सुनील शिर्के इंटक महाराष्ट्र राज्य सचिव राम जोशी पर्यावराण जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील साहेब माजी तालुकाध्यक्ष माजी सभापती कल्याण नाना चौधरी जिल्हा उपाध्यक्ष परशुराम पितंबरे किरण केणे जिल्हा सरचिटणीस रवींद्र पर टोले सूर्यकांत भोईर सरपंच अरविंद मिर कुटे तसेच युवक अध्यक्ष अमोल शिरोशी कल्याण ग्रामीण साधना जगदिश धुमाळ महिला अध्यक्ष कल्याण ग्रामीण गुरुनाथ के ने सेवादल अध्यक्ष यशवंत गोंधळी जगदीश धुमाळ सोशल मीडिया चे किरण धुमाळ भाऊसाहेब फुंदे सोसल मीडिया उपाध्यक्ष ज्येष्ठ कार्यकर्ते गुरुनाथ देसले शैलेश अधिकारी तुषार देसले शेखर गाडे सुनील चौधरी प्रेम शिर्के बंडू डोंगरे अशोक आहीरे काजानिया तसेच ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी चे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .यावैळी महागाई आणी मारक धोरने याला कटांळलैल्या सरकारचा निषेध करुन कल्याण ग्रामिण मधिल अणेक कार्यकर्त्यांनी बी.एन संदिप तसेच जिल्हा अध्यक्ष चोरघे साहेबांच्या उपस्थितीत कॉग्रेसमधे प्रवेश घेतला.शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमातुन कॉग्रेसला नककीच जिल्ह्यात नवसंजीवनी मिळेल हे नक्की.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश अधिकारी यांनी केले तर आभार प्रदर्शन तुषार देसले यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्र गीताने करण्यात आली.

Related posts

नागरिकों ने कूड़े के ढेर में आग लगाकर मनपा प्रशासन का किया विरोध

Bundeli Khabar

रविंद्र तरे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

Bundeli Khabar

नवी मुंबई प्रभाग क्रमांक 97 विकासकामांना गती

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!