31.9 C
Madhya Pradesh
May 19, 2024
Bundeli Khabar
Home » महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी आमदार किणीकर यांच्यासह ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे मंत्रालयात, निवेदन सादर!
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी आमदार किणीकर यांच्यासह ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे मंत्रालयात, निवेदन सादर!

किशोर पाटील/महाराष्ट्र
ठाणे : महाराष्ट्र राज्यातील विविध शैक्षणिक समस्या सुटाव्यात म्हणून दि.२४ नोव्हेंबर २०२१ रोजी अंबरनाथ विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. बालाजी किणीकर व महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष तथा कोकण विभाग शिक्षक सेनेचे अध्यक्ष डॉ .ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या व खालील विषयांवर चर्चा करण्यात आली , त्वरित प्रश्न सोडवण्याची विनंती केली .

१) मंत्रालयात त्रुटी पुर्तता केलेल्या अपात्र शाळांच्या याद्या पात्र म्हणून जाहीर करण्याबाबत . याद्या तयार आहेत, लवकरच वित्त विभागाकडे जातील.
२) संचालक स्तरावरील अघोषित पात्र शाळांच्या याद्या त्वरित मंत्रालयात मागवून अनुदानासह घोषित करणे,
३)१ नोव्हेंबर २००५ पूर्वी शिक्षक शिक्षकेतर बंधु भगिनींना जुनी पेन्शन लागू करण्यासंबंधी मंत्रालयात झालेल्या मीटिंगमधील माहिती जाणून घेतली. पेन्शन लागू करण्यासाठी सर्व माहिती जाणून घेण्यासाठी लवकरच मंत्रिमहोदय व अधिकारी यांची आयुक्तांशी मिटींग होणार आहे.
४) ७ वा वेतन आयोग रजा रोखीकरणाचा शालेय शिक्षण विभागाचा जीआर पारित करणेबाबत .
तसेच शिक्षण उपसंचालक श्री संदीप सांगवे , व श्री सुनील सावंत यांची भेट घेऊन सोबतचे निवेदन देऊन त्यातील विषयांवर चर्चा करून लवकरात लवकर प्रलंबित कामे पूर्ण करून घेण्यासाठी विनंती केली.
१) ठाणे, पालघर ,रायगड मुंबई विभागातील २०% अनुदान प्राप्त झालेल्या उच्चमाध्यमिक शाळांचे सेवक संच मान्यता मिळण्याबाबत .- मागील पंधरा दिवसांपासून शिक्षक सेनेच्या वतीने पाठपुरावा सुरू होता त्यानुसार सेवक संच तयार आहेत ,ज्युनिअर कॉलेजने संपर्क करून सेवक संच ताब्यात घ्यावे.काहींच्या त्रुटी आहेत त्याची पूर्तता करून घ्यावी. तसेच अन्य कॉलेजच्या संचमान्यता शिक्षण उपसंचालकांच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत , त्याची प्रिंट कॉलेज काढून घेऊ शकते असे संदीप सांगवे यांनी सांगितले
२) शिक्षण संचालकांनी जाहीर केलेल्या यादीमध्ये ज्या शाळा ची नावे यादीमध्ये नसतील त्यांचे प्रस्ताव पुन्हा मागून घेणे किंवा उपसंचालक कार्यालयायातून प्रस्ताव पुणे याठिकाणी गेल्याचा पुरावा संबंधित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना देणे. तसेच सहकार्य करणे
अन्य विषय सोबतच्या निवेदनामध्ये आहेत
सोबत ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सहसचिव प्रवीण लोंढे ,माणगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री पारकर ,श्री पवार ,श्री कुशिरे ,श्री म्हात्रे ,विशाल पाटील सर्वच समस्या घेऊन उपस्थित असलेले प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांचे ठाणे पालघर रायगड मुंबईमधील शिक्षक बंधुभगिनी उपस्थित होते.अशी माहिती विष्णू विशे यांच्याकडून देण्यात आली.

Related posts

एनव्हायरोनिक्सचे लोगो रीब्रँडिंग

Bundeli Khabar

शिवसेनचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मुंबई नाशिक महामार्ग अडविला

Bundeli Khabar

पत्रकार क्षेत्रातील मानद डॉक्टरेट मिळविण्याचा पहिला मान संपादक श्री किशोर पाटील यांना

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!