21.6 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » माझे संविधान माझा अभिमान
महाराष्ट्र

माझे संविधान माझा अभिमान

माझे संविधान माझा अभिमान!
संविधान दिनानिमित्त प. अ.जा.विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन !

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : भारतीय संविधान दिनानिमित्त पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भिवंडी येथे वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा ,प्रश्नमंजुषा स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा, शिक्षक फलक लेखन स्पर्धा, संविधान जनजागृती रॅलीचे* आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम सकाळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, पद्मश्री अण्णासाहेब जाधव या महापुरुषांच्या प्रतिमांना व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्यालयातील पुतळ्यास* विद्यालयाचे प्राचार्य श्री. जी.ओ.माळी ,पर्यवेक्षक श्री.के.एन.शेवाळे ,शिक्षक प्रतिनिधी श्री.आर.एच.जाधव,सत्र प्रमुख श्री.सुधीर घागस ,प्राध्यापक श्री.व्ही.बी.खैरनार यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच भारतीय संविधानाच्या प्रतीचे उपस्थित मान्यवरांचे हस्ते पूजन करण्यात आले.

त्यानंतर संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले विद्यालयातील , ज्येष्ठ शिक्षक प्राध्यापक श्री.व्ही.बी. खैरनार यांनी भारतीय संविधानाच्या विविध महत्वपूर्ण घटकांची अभ्यासपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून करून दिली.त्यानंतर प्राचार्य श्री जी.ओ.माळी,पर्यवेक्षक श्री.के.एन.शेवाळे,शिक्षक प्रतिनिधी श्री.आर.एच.जाधव,सत्र प्रमुख श्री.सुधीर घागस यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
“माझे संविधान,माझा अभिमान” या उपक्रमाअंतर्गत विद्यालयातील इयत्ता ५ वी ते १२वी या वर्गासाठी दोन गटात खालील स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.
गट १- इयत्ता ५ वी ते ८ वी
विषय चित्रकला- माझ्या शाळेतील संविधान.
निबंध- भारतीय संविधान.
गट २- इयत्ता ९ वी ते १२वी
निबंध स्पर्धा-
विषय-भारतीय संविधानिक मूल्य.
वक्तृत्व स्पर्धा-
विषय-भारत देशापुढील सद्य स्थितीतील आव्हाने आणि भारतीय संविधान.
गट-३-शिक्षक फलकलेखन.स्पर्धा
विषय-भारतीय संविधान आणि शिक्षण.
प्रश्नमंजुषा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा ,या स्पर्धाचे आयोजन विद्यालयाचे सत्र प्रमुख (सकाळ) श्री.सुधीर घागस व सत्र प्रमुख (दुपार) श्री.व्ही.एन.गव्हाळे यांचे नेतृत्वाखाली करण्यात आले.या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील कलाशिक्षक श्री.टी.के.पाटील,श्री.डी. एस.पवार ,तसेच मराठी विषय शिक्षक श्री.शैलेंद्र सोनवणे ,श्री.रमाकांत विसपुते ,सौ.एस.एम.बनसोडे ,तसेच सौ.एस.पी.जाधव,सौ.एस.एस.काळे , सौ.ए.जी.धानापूने ,सौ.एच.ए,सूर्यवंशी, सौ.डी.एम.बनसोडे,सौ.डी.डी.गुजर,श्री.पी.आर.पाटील,सौ.भारती हलपतराव,श्री.एन.एल.गावित ,श्री.एन.आर.पिंजारी ,* यांनी मेहनत घेऊन स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले.
“माझे संविधान माझा अभिमान’ या उपक्रमाअंतर्गत भिवंडी शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन धामणकर नाका ते वऱ्हाळलदेवी चौकापर्यंत करण्यात आले.रॅलीत इयत्ता ९ वी तुकडी अ/ ब या वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.रॅलीला शुभेच्छा देण्यासाठी संस्थेचे सरचिटणीस श्री.आर.एन.पिंजारी व खजिनदार श्री.जे. डी.भोईर उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी संविधानाविषयी जनजागृती रॅलीचे फलक हाती घेऊन ढोल व ताशांच्या गजरात रॅलीत सहभाग घेतला. शहराच्या मध्यवर्ती भागातून निघालेल्या रॅलीचे अनेक नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.रॅलीचे यशस्वी आयोजन विद्यालायचे क्रीडा शिक्षक श्री.आर.एस.शिंदे व श्री.व्ही.एस.बिरारी यांनी केले.

Related posts

भिवंडीतील पिंपळास गावातील धक्कादायक प्रकार आला समोर, भूमीवर्ड गेटवरील पाईप लाईन आणि शेतकऱ्यांच्या घरचा रस्ता केला बंद।

Bundeli Khabar

नामदेव महाराजांच्या सामाधी स्थळाला पायदळी तुडवल्यामुळे शिंपी समाजाच्या वतीने जाहीर निषेध

Bundeli Khabar

आघाडी असली तरी राष्ट्रवादीचा महापौर करणार

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!