किशोर पाटील/महाराष्ट्र
पंढरपूर : भाजपच्या स्टंटबाज कार्यकर्त्यांचा विठ्लाच्या दारात धुडगूस मंदिर उघडा आंदोलनाच्या नावाखाली भाजपच्या पुढाऱ्यांनी वारकरी संप्रदायातील संत नामदेव महाराज समाधी स्थळ पंढरपूर .विठ्ठल मंदिराचे प्रवेश द्वार येथे चपला घालून, भाजपचे झेंडे नाचवून आणि पक्षाच्या नवांन जयघोषाच्या घोषणा देऊन धुडगूस घातला.ही निंदनीय बाब आहे आणि सर्व समाज बांधवांनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे आणि भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जाहीर माफी मागावी व परत असे कृत्य होणार नाही याची हमी दयावी
अखिल भारतीय शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष आणि सर्व समाज बांधव अखिल भारतीय शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेचे संचालक डॉ. मनिलाल शिंपी ( कल्याण )यांच्यासह श्री विशाल अशोक कापडे उपाध्यक्ष, श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज नवयुवक मंडळ,दोंडाईचा धुळे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख, युवक आघाडी सर्वांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.त्यामुळे या घटनेची नोंद शासन दरबारी घेतली जावी अशी आशा अखिल भारतीय शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेचे संचालक डॉ. मनिलाल शिंपी ( कल्याण )यांनी व्यक्त केली आहे।
Home » नामदेव महाराजांच्या सामाधी स्थळाला पायदळी तुडवल्यामुळे शिंपी समाजाच्या वतीने जाहीर निषेध
next post

