22.4 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » आघाडी असली तरी राष्ट्रवादीचा महापौर करणार
महाराष्ट्र

आघाडी असली तरी राष्ट्रवादीचा महापौर करणार

• आघाडी असली तरी राष्ट्रवादीचा महापौर करणार
•युवकांना जास्तीत जास्त संधी
•आता शतकी खेळी करणार

प्रमोद कुमार/महाराष्ट्र

कल्याण : राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यामध्ये केलेल्या विकासकामांच्या आणि पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जी घोडदौड सुरू आहे. त्या घोडदौडींकडे पाहता आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत १०० + चा नारा देत महापौर राष्ट्रवादीचाच बसेल यात संदेह नसावा असा आत्मविश्वास युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी व्यक्त केला।


कल्याण मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवक जिल्हाध्यक्ष सुधीर वंडारशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठकीचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना सुधीर पाटील यांनी सांगितले की, कल्याण-डोंबिवली महापालिकेला राष्ट्रवादीला पोषक वातावरण आहे. आता जनता युतीच्या करनाम्यांना कंटाळली असून केवळ राष्ट्रवादी हा पर्याय समोर असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच पक्षामध्ये युवकांचा प्रवेश मोठ्या प्रमाणामध्ये होत असून आजच्या मेळाव्याला आलेली उपस्थिती हे त्याचं प्रतिक आहे. असाच उत्साह कार्यकर्त्यांनी मनामध्ये बाळगून एकमेकांशी सहकार्याची भावना घेऊन पुढे जावं असे आवाहन पाटील यांनी केले. तसेच महापौर राष्ट्रवादीचा व तो युवा नेता बसवण्याचा आपल्याला संधी असून ती सोडता कामा नये असे आवाहन पाटील यांनी केले।

यानिमित्ताने युवकांची मोठी शक्ती आपल्या पक्षामध्ये दिसून येईल आणि भविष्यातील येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये नव्या उमेदीचे चेहरे देऊन पक्षाला बळकटी देण्याच्या स्वप्न पवार साहेबांनी बघितले आहे. हीच संधी आपण देखील दवडता कामा नये. आणि आघाडी सरकारने केलेली विकास कामे नागरिकांसमोर ठेवावीत. यासाठी वरिष्ठ पातळीवरून जे काही सहकार्य लागेल ते सर्वतोपरी देण्याचा प्रयत्न मी करेल अशी ग्वाही सुधीर पाटील यांनी यावेळी दिली।
यानिमित्ताने महिलांना देखील उमेदवारी मध्ये संधी देऊन मोठ्या प्रमाणात महिला सक्षमीकरण याचा विचार यावेळी पुढे आला. त्याचे उपस्थितांनी स्वागत केले. आणि पक्षाला तीन आकडी बळकट देण्यास आम्ही सज्ज आहोत असा नारा देखील दिला. तसेच अधिकाऱ्यांशी बोलताना स्पष्ट आणि रोखठोक बोलावे असे मोलाचे मार्गदर्शन यावेळी कार्यकर्त्यांना करण्यात आले. नागरिकांमध्ये वावरताना त्यांच्या अडचणी व समस्या सोडवताना प्राधान्य द्यावे असे यावेळी सूचित करण्यात आले. शहरांमधील नागरी समस्या काय आहेत याचा अभ्यास करून त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्यावर त्यांनी भर द्यावा असे आव्हान उपस्थितांना करण्यात आले।


ग्रामीण भागातील पाणी समस्या तसेच शहरी भागातील खड्डे, कचरा, प्रदूषण, रेल्वे प्रवाशांच्या समस्या, शाळांच्या फी वाढीबद्दलच्या समस्या या सर्वांवर प्रकाशझोत टाकल्यास नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होईल. आणि त्या माध्यमातून एक सक्षम कार्य देखील होऊ शकत. आपली नाळ नागरिकांशी असून त्यानिमित्ताने सगळ्यांनी निवडणूकीच्या धागा पकडून पुढे जायला हवं हे सूत्र लक्षात घेऊन कामाला लागावे असे आवाहन करून युवकांना मार्गदर्शन करण्यात आले. या निमित्ताने लोकसभा, विधानसभेला जशी बुथ रचना चांगली केली होती. तशीच पुन्हा मोट बांधण्याचे कार्य जेष्ठांनी करावे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष सक्षम करावा असा विचार पुढे आला।


याप्रसंगी जिल्हा निरीक्षक मयूर गायकवाड, कल्याण पूर्व विधानसभा निरीक्षक सुनील पालवे, प्रदेश सरचिटणीस अरुण आजबे, प्रदेश सरचिटणीस बिरू वाघमारे, कल्याण पश्चिम अध्यक्ष संदीप देसाई, कार्याध्यक्ष उदय जाधव, जिल्हा सरचिटणीस प्रशांत माळी, युवक पदाधिकारी योगेश माळी, विश्वास आव्हाड, प्रसाद गायकवाड, नितीन लोहोटे, सुनील सिंग, भावेश सोनवणे, गिरीश पाटील, शशांक माने, कल्पेश आहिरे, उमेश सहाने, मयुर गायकवाड, ब्रिजेश कांबळे, ओम सावंत, वरुण गायकर, प्रशांत नगरकर, सुनील बोरणाक, केतन जगताप, हेमंत मिरकुटे, सचिन कातकडे, गणेश जाधव, हेमंत शिंदे, मयुरेश विसावे, रितेश म्हात्रे, वैभव मोरे, शरद म्हात्रे, आकाश कांबळे, मारुती मांडेकर, संजय देवकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।

Related posts

कल्याण डोंबिवली महानगर पालीका अ प्रभाग क्षेञातील आदिवासी कातकरी वाडी वस्तीचे भयान वास्तव,देशस्वातंत्र्याचा 74 वर्षे उलटूनही आदिवासी समाजाची परिस्थिती जैसे थे

Bundeli Khabar

सिमेंट कॉन्क्रीटीकरणावर पडवळांचे लक्ष

Bundeli Khabar

सामाजिक जाणिवेतून ‘वाढदिवस’ साजरा

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!