38.9 C
Madhya Pradesh
May 17, 2024
Bundeli Khabar
Home » सेकंडरी स्कूल एम्प्लॉइज पतपेढी क्रेडिट सोसायटीच्या निवडणुक प्रचाराचा कल्याण मधून शुभारंभ
महाराष्ट्र

सेकंडरी स्कूल एम्प्लॉइज पतपेढी क्रेडिट सोसायटीच्या निवडणुक प्रचाराचा कल्याण मधून शुभारंभ

८३ वर्षाच्या शकुंतला पाटील यानी केला प्रचाराचा श्रीगणेशा!

किशोर पाटील/महाराष्ट्र
कल्याण : “एकमेका सहाय्य करू, अवघे धरु सुपंथ ” या उक्तिला साजेसा असणाऱ्या सहकार पैनलने काल ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरातील श्री गजानन विद्यालय येथे श्रीफल वाढवून आपल्या उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली. येत्या १८ डिसेंबर रोजी होनाऱ्या सेकंडरी स्कूल एम्प्लाइज क्रेडिट सोसायटी मुंबई या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पतपेढीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण शहरातील कैप्टन रविन्द्र माधव ओक हायस्कूलचे शिक्षक व यावेळचे उमेदवार गजानन पाटील यांच्या अथक परिश्रमाने श्री गजानन विद्यालय कल्याण येथे अनेक सभासद व मतदारांच्या उपस्थितीत सहकार पैनलच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.जवळ-जवळ ३२००० सभासद असलेल्या व राज्यातील २२ जिल्ह्यात आपला आवाका निर्माण करणाऱ्या यावेळच्या निवडणुकीत सहकार पैनल वरचढ़ होत असल्याचे दिसत आहे.सहकार पैनलच्या १९ च्या १९ उमेदवाराना निवडून आणन्यासाठी आम्ही कंबर कसु अशी प्रतिक्रिया यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाटील बालमंदिर मोहनेचे संस्थापक बी एन पाटील व विद्यासेवक पतपेढीचे अध्यक्ष सुधीर घागस यांनी दिली. यावेळी सहकार पैनलला शिक्षणाक्रांति संघटना, शिक्षक भारती संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, क्रांति सेना, शिक्षक परिषदेचे श्री आर डी पाटिल , मुख्याध्यापक संघ यांचा पाठिंबा मिळत असल्याने सध्या सहकार पैनलचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. यावेळी या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला उमेदवार कल्पना शेंडे, राज बोराडे, प्रकाश शेळके, सत्येन्द्र सिंग तसेच तड़वी , शिंगारे , शिक्षक भारतीचे जालिन्दर सरोदे, सुभाष मोरे, दहिसर मुंबई येथील मुख्याध्यापक संजय पाटील, आर एस पी कल्याण ठाणे यूनिटचे कमांडर डॉ.श्री.मनिलाल रतिलाल शिंपी , कीनगे ,जितेंद्र सोनावणे , शरद बोरसे तसेच उत्तम गायकवाड़ , मारुती परड़कर , शिवाजी खैरमोड़े , शिक्षण क्रांति संघटनेच्या राज्यअध्यक्षा ज्योति पाटील, विद्यासेवक पतपेढीचे खजिनदार नरवाड़े , शिक्षण क्रांति संघटनेचे कल्याण – डोंबिवली सचिव थॉमस शिंगारे , गजानन विद्यालयच्या मुख्याध्यापिका कांचन भालेराव , गजानन पाटील यांच्या कुटुंबातील आई शकुन्तला पाटील, पत्नी प्रेरणा पाटील, सासरे ए. टी. पाटील , तसेच सातवे आदी उपस्थित होते.यावेळी कल्याण- डोंबिवली मधील अनेक शिक्षक व सभासद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भरत दळवी यानी केले तर आभार ओक हायस्कूलचे वरिष्ठ शिक्षक गायकवाड़ यानी मानले. ओक हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मेधा कुलकर्णी यानीही सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

Related posts

यूपीएल लि. और गुजरात टाइटंस ने सस्टेनेबिलिटी के लिए किया सहयोग

Bundeli Khabar

अलग अलग दलों के सैकड़ों कार्यकर्ताओं का शिवसेना में प्रवेश

Bundeli Khabar

अर्जुनली ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!