40.2 C
Madhya Pradesh
May 16, 2024
Bundeli Khabar
Home » अर्जुनली ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे
महाराष्ट्र

अर्जुनली ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे

अर्जुनली ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे
सामान्य नागरिकांची कचऱ्याच्या दुर्गंधीत साजरी झाली दिवाळी!
ग्राम पंचायत हद्दीत कचऱ्याचे साम्राज्य.

किशोर पाटील/महाराष्ट्र
पडघा : सध्या देशात कोरोनाने हैदोस घातल्या नंतर स्वच्छता हा महत्वाचा विषय बनला आहे लोकांनी मास घालणे ,वारंवार हात धुणे या माध्यमातून कोरोना वर काही अंशी विजय मिळवला आहे असे असताना स्वच्छतेनेच रोगावर नियंत्रण मिळवू शकता येते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे
असे असताना देखील पडघा नाशिक हायवे नजीक हाकेच्या अंतरावर असलेल्या अर्जुनली ग्राम पंचायत हद्दीत गणेश नगर वस्ती जवळील सर्व्हिस रोज लगत मोठया प्रमाणात कचऱ्याचा ढीग जमा झाला असून लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे
सदर कचऱ्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या मेलेली जनावरे सडलेले कुजलेले अन्न याचा समावेश असल्याने लोकवस्तीत मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून स्थानिक नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून तक्रारी नंतर ही ग्राम पंचायत कडून कचरा उचलला जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे
कचऱ्यावर मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झाली असून या मुळे डेंगू मलेरिया सारखे आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही ,ग्राम पंचायत प्रशासन कडून परिसरात कोणत्या ही प्रकारे कीटकनाशके फवारणी अद्याप झाली नसल्याचे देखील ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे
वारंवार कळवून सुद्धा ग्राम पंचायत प्रशासन उदासीन

स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्राम पंचायत मध्ये कचरा व्यवस्थापन साठी घंटा गाड्या सफाई कर्मचारी या साठी शासनाकडून भरीव निधीची तरतूद आणि अंमल बजावणी केलेली असते परंतु उदासीन ग्राम पंचायत प्रशासन कडून मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जात असल्यामुळे परिसरात साठीच रोगाची भीती व्यक्त केली जात आहे
अर्जुनली ग्राम पंचायत कडे असलेली कचरा व्यवस्थापन टीम फक्त व्यवस्थापन कागदावर दाखवून शासनाचा पैसा आणि जनतेचे आरोग्य धोक्यात घालवते असेच म्हणावे लागेल
ऐन दिवाळीत देखील अर्जुनली ग्राम पंचायत चे ग्राम विकास अधिकारी श्री अहिर यांना वारंवार कळवून सुद्धा आश्वासन देऊन सुध्दा कचरा उचलण्यात आला नाही त्यामुळे ग्राम विकासा पेक्षा इतर कोणत्या महत्वाचा कामात ग्राम विकास अधिकारी व्यस्थ होते असा प्रश्न उपस्थित होत आहे
ग्राम पंचायत अर्जुनली प्रशासनाने लवकरात लवकर सर्व कचरा व्यवस्थापन करून ठोस उपाय योजना करण्याची गरज असून कायम स्वरुपी नियोजन करून कचरा प्रश्न सोडवावा अन्यथा कचरा प्रश्न पेटल्या शिवाय राहणार नाही अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून येऊ नी सरपंच अर्जुनली यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

Related posts

स्वामी सामाजिक सेवा प्रशिक्षण वर्ग

Bundeli Khabar

मानवी तस्करी कार्यशाळेचा समारोप

Bundeli Khabar

मुंबई महापालिका क्षेत्रातील पाचशे फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!