21.9 C
Madhya Pradesh
January 29, 2026
Bundeli Khabar
Home » राज्यमंत्री विवेक पंडित यांचा कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात पाहणी दौरा
महाराष्ट्र

राज्यमंत्री विवेक पंडित यांचा कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात पाहणी दौरा

Bundelikhabar

मुम्बई / संदीप शेंडगे
कल्याण : आदिवासी विकास क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष राज्यमंत्री विवेक पंडित यांचा कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासींच्या समस्या जाणून घेण्यासाठी पाहणी दौरा आखण्यात आला होता. यावेळी
कल्याण तालुक्यातील खडवली, जिभोणी, कातकरीपाडा, वाव्होली, सागवाडी, मानिवली कातकरीपाडा , नेतीवली कातकरीपाडा या ठिकाणी पाहाणी दौरा करून आदिवासी जमातीतील कातकरी कुंटुबांची नागरी सुविधांबाबत चौकशी केली. देशाच्या स्वांतञ्याच्या ७४ वर्षानंतर स्वांतञ्याची किरणे गरीबांच्या झोपड्डी पर्यंत आजही पोहचलेली नाहीत. अनेक आदिवासी कुंटुबांना घरकुल नाही. शुध्द पिण्याचे पाणी नाही, आधारकार्ड नाही ,रेशनकार्ड नाही. हे सर्व शासकीय कागदपत्रे कातकरी कुंटुबांना मिळाले पाहीजेत. या बाबत शासनाने ठरवुन दिलेल्या योजनांची अंमलबजावणी शासकीय अधिकाऱ्यांनी करावी असे त्यांनी मत व्यक्त करतांना राज्यमंत्री विवेक पंडित यांनी सांगितले. यावेळी एकात्मिक आदिवासी प्रकल्प शहापुर प्रकल्प आधिकारी आर.एच.किल्लेदार, तहसिलदार दिपक आकडे, गटविकास आधिकारी श्वेता पाळवे, महिला व बालविकास प्रकल्प आधिकारी चौधरी खडवली, नंडगाव , वाव्होली, सजा तलाठी मंडळ आधिकारी सांळुखे, संबधित ग्रामपंचायतिचे ग्रामसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्षेञ आधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विवेक पंडित यांच्या शौर्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडायची पाहायला मिळाली यावेळी श्रमजीवी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष आशोक सापटे, जिल्हासरचिटणीस राजेश चन्ने, दशरथ भालके तालुकाअध्यक्ष विष्णु वाघे , उपाध्यक्ष ज्योती फसाले, विभागीय सचिव लक्ष्मण वाघे यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी व पदाधिकारी यांची पाहणी दौ-या दरम्यान उपस्थीती होती।


Bundelikhabar

Related posts

“आज़ाद” के टीजर में दमदार दिखे अजय देवगन के साथ अमन देवगन और राशा थडानी

Bundeli Khabar

टिकट निरीक्षक की कोशिश से दो नाबालिग सुरक्षित अभिभावक को सौंपे

Bundeli Khabar

समाजसेवक शंकर गुप्ता का निधन, वणिका दर्पण के संपादक शुभनारायन साह को सदमा

Bundeli Khabar
error: Content is protected !!