36.7 C
Madhya Pradesh
May 5, 2024
Bundeli Khabar
Home » नाविक कामगार संघटनेचा एकजूट दिन साजरा
महाराष्ट्र

नाविक कामगार संघटनेचा एकजूट दिन साजरा

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारतीय कामगार चळवळीत कामगार संघटना कायद्यापूर्वी १८९६ साली स्थापन झालेल्या नुसी कामगार संघटनेने ६ नोव्हेंबर २०२१ रोजी संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन हिरानंदानी यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ कामगार नेते ऍड. एस. के. शेट्ये यांच्या प्रमुख उपस्थितीत परेल येथील दामोदर सभागृहामध्ये संघटनेची १२५ वर्षे व एकजूट दिन कोरोनाचे नियम पाळून साजरा केला.
याप्रसंगी नुसीचे जनरल सेक्रेटरी अब्दुल गणी सेरंग यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले की, ६ नोव्हेंबर १९६३ रोजी सर्व कामावर संघटना एकत्र येऊन नुसी कामगार संघटनेची स्थापना केली. तेव्हापासून ६ नोव्हेंबर हा नाविकांचा एकजूट दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी नाविकांना भरपगारी सुट्टी मिळते. नुसीला शिप ओनर असोसिएशनचे चांगले सहकार्य मिळते. त्यामुळे नाविक कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. शैक्षणिक क्षेत्रात प्राविण्य मिळविल्याबद्दल कामगारांच्या मुलांचा गुणगौरव, महिलांना उद्योगासाठी अर्थसहाय्य, सेवानिवृत्त कामगारांना मदत, नोकरीसाठी प्रशिक्षण, नुसी सक्षम, नुसी स्वास्थ्य, नुसी शिक्षण, स्कॉलरशिप, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कामगाराला एक कोटी मदत तसेच लोणावळा येथील नुसी रिसॉर्टमध्ये काही नाविकांचा शेवटचा धार्मिक विधी केला जातो.
ज्येष्ठ कामगार नेते ऍड. एस. के. शेट्ये यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, देशातील परिस्थिती गंभीर आहे. मोदी सत्तेवर आले, तेव्हा त्यांनी आश्वासन दिले होते की, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा केले जातील, दोन कोटी लोकांना रोजगार दिले जातील. परंतु कोणतीही आश्वासने पूर्ण केली नाहीत. उलट रोजगार वाढले नसून कमी झाले आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ४० हजार कामगार होते, आज पाच हजार कामगार आहेत. मिंट टांकसाळमध्ये १६०० कामगार होते, आज ३७६ कामगार आहेत. कोरोनाला दोन वर्षे होत आली असून त्याला आता पळवून लावले पाहिजे. नाविकांना व असंघटीत कामगारांना संजीवनी देणाऱ्या नुसीला गोदी कामगारांच्या वतीने शुभेच्छा. याप्रसंगी नुसीचे अध्यक्ष कॅप्टन हिरानंदानी, कॅप्टन प्रदीप कोरिया, कॅप्टन विकास, कॅप्टन हळबे यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले. सभेचे सुंदर सूत्रसंचालन नुसीचे असिस्टंट सेक्रेटरी सुनील नायर यांनी केले, तर आभार लुईस फिलिप्स यांनी मानले. सुरवातीला सुंदर मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर नुसीचे असिस्टंट जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर यांनी दिग्दर्शित केलेली संघटनेची १२५ वर्षाची ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नुसीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related posts

प्रि. महाडिक उद्यानाच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन

Bundeli Khabar

गोदाम से चोरी किया 12 लाख का परफ्यूम व मेहदी सामग्री को किया बरामद ।

Bundeli Khabar

ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेसची डिजीटल सदस्य नोंदणी आढावा बैठक संपन्न

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!