40.7 C
Madhya Pradesh
June 8, 2026
Bundeli Khabar
महाराष्ट्र

कॅन्सरग्रस्त रुग्णांसोबत “स्वामी”ची दिवाळी

Bundelikhabar

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ‘स्वामी’ ही संस्था समाजातील गरीब गरजू लोकांसाठी आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण या क्षेत्रात विविध उपक्रम राबवित असते . त्यापैकी एक उपक्रम म्हणजे “कॅन्सरग्रस्त रुग्णांसोबत दिवाळीची एक आनंदी संध्याकाळ आणि फराळ वाटप”. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी के. भावसार सभागृह, परेल, मुंबई येथे . मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासह परगावाहून आलेल्या ३५० कॅन्सरग्रसरुण आणि त्यांचे नातेवाईकांना दिवाळी फराळासोबत बॅग, साडी, टॉवेल, साबण, तेल व पावडर इत्यादींचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी विभागातील आमदार अजय चौधरी, नगरसेविका सिंधुताई मसुरकर, गजानन चव्हाण उपविभाग प्रमुख शिवडी विधानसभा यांच्यासोबत नितीन कदम श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास माजी विश्वस्त, उद्योजक कांतीलाल साखरीया, बाबुभाई सोलंकी, दिलीपभाई जैन, डॉ. यतीन पटेल, शरद डिचोलकर फेस्कॉम अध्यक्ष, पुजा पेडणेकर देणगीदार, स्वामीचे अध्यक्ष सुरेश लाड, खजिनदार मोहन कटारे, ऑडिटर श्रीकांत कुलकर्णी, श्रीनिवास जोशी अंतर्गत हिशेब तपासनीस उपस्थित होते.
त्या प्रसंगी कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनोरंजनासाठी स्वामीच्या विरंगुळा ज्येष्ठ नागरिक केंद्राचा सुगम संगीताचा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्या कार्यक्रमाचे संयोजन विमल माळवदे यांनी केले तर खुमासदार सूत्रसंचालन प्रतिभा सावंत यांनी केले. तालबद्ध वाद्यवृंदाची जबाबदारी हार्मोनियमवर दत्ताराम घाडी, नंदकुमार आरोंदेकर, राजरत्न कदम, ढोलकीपटू दिलीप मेस्त्री, सिंथेसायझरवर प्रदीप चिपकर, ऑक्टोपॅड सचिन मोहिते, तालवाद्य शिवाजी गावकर, व्हायोलिन मंगेश तळगावकर, माऊथ ऑरगन मधुकर परब यांनी संभाळली.
तर उपस्थितांना शुभदा मोरे, शैलजा काळे, वैशाली सूद, सुनिता पारकर, वंदना भाटवडेकर, राजरत्न कदम, मधुकर परब, गणेश करलकर, जगदीश काळे, कांतीलाल परमार, दिलीप मेस्त्री यांनी आपल्या गायनाने मंत्रमुग्ध केले.
सभागृहात येणाऱ्यांच्या स्वागतासाठी मनमोहक रांगोळी ममता खेडेकर आणि रश्मी नाईक यांनी साकारली होती.
मुख्य कार्यक्रमाचे समयसूचक सूत्रसंचालन अनिल तावडे आणि साध्वी डोके यांनी केले. तर आभारप्रदर्शन सुरेश लाड यांनी केले.
रुग्णांची नावनोंदणी करण्यासाठी सुमंगल गुरव, वैशाली शिंदे आणि विमल माळवदे तत्पर होत्या. कार्यक्रमाची व्यवस्था सुरेंद्र व्हटकर, साध्वी डोके, गोविंद राणे, नितीन तांबे, मनियार, तोंडवलेकर, रचना खुळे, प्रतिभा सपकाळ, प्रियांका गायकर, लखबीर कौर, सुरिंदर कौर, नम्रता व्हटकर, सुरेखा निमकर, योगिनी लाड, उर्मिला जाधव, निलेश पाठारे यांनी चोख सांभाळली.


Bundelikhabar

Related posts

जड अंतकरणाने भक्तांनी दिला दिड दिवसांच्या बाप्पाला निरोप

Bundeli Khabar

मुंबईकरांचं पाणीही महागलं, पाणीपट्टीत 7.12 टक्क्यांनी वाढ; १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी

Bundeli Khabar

राज्यस्तरीय गझल लेखन महास्पर्धेच्या चौथ्या पर्वाला जानेवारीपासून प्रारंभ

Bundeli Khabar
error: Content is protected !!